Mumbai Indiansचं कर्णधारपद पोलार्डकडे, CSKने जिंकला टॉस; हिटमॅन नसल्यामुळे मुंबईला मोठा धक्का?

रोहित शर्मा आजच्या सामना खेळणार नसल्यानं कायरन पोलार्ड संघाचं नेतृत्त्व करत आहे. दरम्यान, रोहितला संघाबाहेर बसविण्याचं नेमकं कारण अद्याप देण्यात आलेलं नाही. तसेच रोहित शर्मासोबतच मुंबईचा धडाकेबाज फलंदाज हार्दिक पंड्या देखील आजचा सामना खेळणार नसल्याचं पोलार्डनं सांगितलं आहे

    आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सत्राला सुरूवात झाली आहे. आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians Vs Chennai Super Kings)यांच्यामध्ये पहिला सामना खेळवला जात आहे. चेन्नई सुपरकिंग्जनं सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. परंतु मुंबई इंडियन्सला सामन्याआधीच मोठा धक्का बसला आहे.  आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्त्व रोहित शर्माकडे नसून कायरन पोलार्डकडे संघाची धुरा देण्यात आली आहे.

    रोहित शर्मा आजच्या सामना खेळणार नसल्यानं कायरन पोलार्ड संघाचं नेतृत्त्व करत आहे. दरम्यान, रोहितला संघाबाहेर बसविण्याचं नेमकं कारण अद्याप देण्यात आलेलं नाही. तसेच रोहित शर्मासोबतच मुंबईचा धडाकेबाज फलंदाज हार्दिक पंड्या देखील आजचा सामना खेळणार नसल्याचं पोलार्डनं सांगितलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला आज सुरुवातीच्याच सामन्यात दोन धक्के बसले आहेत.