आज शुभमनची मैदानावर शुभमनची बॅट तळपली, पठ्ठ्याने तुफानी फलंदाजी करीत ठोकले 100, आज तोडणार सर्व रेकॉर्ड

आज मैदानावर शुभमनची बॅट तळपली आणि तिने चमत्कार केला. पहिली लवकर गेल्यानंतर पठ्ठ्याने एकहाती धावसंख्या पळवली. स्वतःचे शतक अवघ्या 50 चेंडूत करून आज नवीन रेकॉर्ड केला. आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्या करणारा पहिला खेळाडू ठरला.

    अहमदाबाद : आज शुभमन गिलची बॅट मैदानावर तळपत होती, त्याने असे उत्तुंग षटकार ठोकत मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. त्याच्या खेळीमध्ये त्याने 8 षटकार ठोकत 100 धावा पूर्ण केल्या. त्याने आज अॉफसाईड आणि मिडॉनच्या वरून तुफान बॅटींग करीत मुंबईच्या गोलंदाजांना धुवून काढले.

    गुजरात आणि मुंबईचे हेड टू हेड रेकॉर्ड
    गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त 3 सामने झाले आहेत. यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने दोन सामने जिंकले आहेत तर गुजरातने केवळ एकच सामना जिंकला आहे. गुजरात सर्वोत्तम पाठलाग करणारा संघ मानला जातो. मुंबई हा पहिला संघ आहे ज्याविरुद्ध हार्दिक पंड्याचा संघ पाठलाग करताना पराभूत झाला आहे. या मोसमातही तो मुंबईविरुद्ध पाठलाग करताना हरला.

    मुंबईविरुद्ध आणखी एकच पराभव
    गुजरात टायटन्स आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त मुंबई इंडियन्सविरुद्ध एकापेक्षा जास्त वेळा पराभूत झाला आहे. इतर सर्व संघांविरुद्ध गुजरातचा वरचष्मा आहे. गुजरातची गोलंदाजी ही लीगमधील सर्वोत्तम गोलंदाजी मानली जाते. गुजरातविरुद्ध सर्वात मोठी धावसंख्या करण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. त्याच मोसमात मुंबईने 5 विकेट्सवर 218 धावा केल्या होत्या.