आज भारत-न्यूझीलंड टी २० मालिकेतील अखेरचा सामना; कधी, कुठं पाहाल मॅच?

कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध नॅपियर येथील मॅकलिन पार्क क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळणार आहे. यासामन्यासाठी भारतीय संघात बदलाची शक्यता आहे. यासामन्यासाठी संघात नवीन खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.

  टी २० विश्वचषकात पराभवाचा सामना केल्यानंतर संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. आज २२ नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवला जाणार आहे. भारत-न्यूझीलंड मधील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला तर दुसरा सामना भारताने ६५ धावांनी जिंकला. आजच्या निर्णायक सामन्यात कोण बाजी मारून मालिका विजय प्राप्त करणार हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे.

  कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध नॅपियर येथील मॅकलिन पार्क क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना दुपारी १२ वाजता खेळवला जाणार असून त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. यासामन्यासाठी भारतीय संघात बदलाची शक्यता आहे. यासामन्यासाठी संघात नवीन खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.

  कुठे पाहता येणार सामना?

  सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकणार आहे.

  टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ :

  हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.