आयपीएल 2021च्या महामुकाबल्याला सुरुवात, CSK ची बॅटींग तर KKR ची बॉलिंग, कोणता संघ मारणार बाजी?

सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर चेन्नई पहिली फलंदाजी करणार आहे. मागील वर्षीची चेन्नईची कामगिरी निराशाजनक होती परंतु यंदाच्या मोसमात चेन्नईने अभूतपुर्व कामगिरी केली असून अंतिम सामन्यात धडक दिली आहे.

    IPL 2021 ची आज सांगता होत आहे. स्पर्धेतील अंतिम सामना कोलकाता नाइट राइडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK vs KKR) या दोघांमध्ये दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर पार पडत आहे. या अखेरच्या आणि महत्त्वाच्या सामन्यात विजयासाठी दोन्ही संघ शर्थीचे प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर चेन्नई पहिली फलंदाजी करणार आहे. मागील वर्षीची चेन्नईची कामगिरी निराशाजनक होती परंतु यंदाच्या मोसमात चेन्नईने अभूतपुर्व कामगिरी केली असून अंतिम सामन्यात धडक दिली आहे.

    दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत तीन वेळा आयपीएलमध्ये जेतेपद पटकावले आहे. तर मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्सला तिसऱ्यांदा चॅम्पियन व्हायचे आहे. त्यामुळे कोणता संघ आयपीएल 2021 ची ट्रॉफी जिंकणार, याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं आहे.