IPL-2021 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबमध्ये होणार जंगी सामना, मुंबईशी बरोबरी साधण्यासाठी दोन्ही संघाला सुवर्णसंधी

मुंबईचं रनरेट -०.०७१ तर राजस्थान -०.१९० आणि पंजाबचा रनरेट -०.३६८ इतका आहे. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने आयपीएलमध्ये ८८ संघापैकी ७९ सामन्यांमध्ये २ हजार ९७८ इतक्या धावा काढल्या आहेत. त्यामुले ३ हजार धावा पूर्ण करण्यासाठी तो २२ धावांपासून जवळील अंतरावर आहे.

    आयपीएल २०२१ (IPL 2021) च्या दुसऱ्या सत्रामध्ये आज (मंगळवार) राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स (RR VS PBKS) यांच्यामध्ये जंगी सामना होणार आहे. दोन्ही संघामध्ये चुरशीची लढत होणार असून मुंबई इंडियन्सशी (MI) बरोबरी साधण्यासाठी सुवर्णसंधी आहे. मुंबईच्या ८ सामन्यांपैकी ८ अंक आहेत. तर राजस्थान ७ आणि पंजाब ६ अंकांवर आहे. त्यामुळे मुंबईकडून चौैैथं स्थान हिरावून घेण्यासाठी दोन्ही संघाला जिंकणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.

    मुंबईचं रनरेट -०.०७१ तर राजस्थान -०.१९० आणि पंजाबचा रनरेट -०.३६८ इतका आहे. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने आयपीएलमध्ये ८८ संघापैकी ७९ सामन्यांमध्ये २ हजार ९७८ इतक्या धावा काढल्या आहेत. त्यामुले ३ हजार धावा पूर्ण करण्यासाठी तो २२ धावांपासून जवळील अंतरावर आहे.

    राहुलला आयपीएलमध्ये सर्वात जलद ३००० धावा करणारा दुसरा फलंदाज बनण्याची संधी आहे. सर्वात वेगाने हा टप्पा गाठण्याचा विक्रम त्याच्याच संघाच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने आयपीएलमध्ये ७५ डावांमध्ये ३००० धावा केल्या होत्या.