मुंबईमध्ये Game Changer चा समावेश, चेन्नईला पडू शकतो भारी

आयपीएल स्पर्धेचा पहिल्या टप्प्यामध्ये २९ मॅच झाल्या. २ मे रोजी पहिल्या टप्प्यातील शेवटची मॅच पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात झाली होती. आता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सयांच्या लढतीनं आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. 

  आयपीएल २०२१ (IPL 2021) च्या दुसऱ्या सत्राला सुरूवात झाली आहे. आजपासून आयपीएलला १९ सप्टेंबर रोजी सुरूवात झाली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) यांच्यामध्ये पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार सलामीवीर असून निर्णय घेणारे खेळाडू आहेत. मुंबईच्या टीमला रोहितची (ROHIT SHARMA) साथ असणार आहे. तर चेन्नईचं महेंद्र सिंग धोनी(MS DHONI) नेतृत्व करणार आहे.

  आयपीएल स्पर्धेचा पहिल्या टप्प्यामध्ये २९ मॅच झाल्या. २ मे रोजी पहिल्या टप्प्यातील शेवटची मॅच पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात झाली होती. आता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सयांच्या लढतीनं आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू होत आहे.

  तब्बल साडेचार महिन्यानंतर आयपीएल स्पर्धा (IPL 2021) पुन्हा एकदा सुरु होत आहे. यापूर्वी या स्पर्धेचा पहिला टप्पा भारतामध्ये झाला होता. त्यावेळी बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानं ही स्पर्धा स्थगित करावी लागली होती.

  CSK vs MI चा मुकाबला, कधी आणि कुठे पाहता येणार?

  मुंबईची संभाव्य टीम –

  रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, जेम्स नीशम/नॅथन कुल्टर-नाइल/ एडम मिल्ने, राहुल चहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह

  चेन्नईची संभाव्य टीम – 

  ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोईन अली, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, सॅम करन, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार/विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, दीपक चहर, जॉस हेजलवूड/लुंगी एनगिडी, इम्रान ताहीर