आयपीएल २०२१ला सुरुवात होण्यापूर्वी विराटनं वर्ल्ड कपनंतर ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma) हे कर्णधारपदासाठी नाव पुढे आलं आहे. रोहितसह लोकेश राहुल व रिषभ पंत ही नावंही चर्चेत आहेत. पण संपूर्ण संघात मोठे फेरबदल होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा १४ नोव्हेंबरला संपणार आहे आणि तीन दिवसांनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. १७, १९ आणि २१ नोव्हेंबरला अनुक्रमे जयपूर, रांची आणि कोलकाता येथे ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर कानपूर व मुंबई येथे दोन कसोटी सामने खेळवण्यात येतील.

७ डिसेंबरला ही मालिका संपेल आणि भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी १७ डिसेंबरपासून खेळवण्यात येईल.