हैदराबादला दोन मोठे धक्के, कर्णधार केन विल्यमसन 11 धावा करुन बाद

मागील सामन्यात संघासाठी दमदार कामगिरी करणाऱ्या जेसन रॉयला आज मात्र खास कामगिरी करता आली नाही. तो केवळ 2 धावा करुन बाद झाला आहे. हेजलवुडच्या चेंडूवर धोनीने त्याची कॅच घेतली आहे.

    IPL 2021 च्या 43 वा सामना सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (CSK) यांच्यात खेळवला जात आहे. हा सामना शारजाहच्या मैदानावर सुरु आहे. आतापर्यंत हंगामातील कामगिरी पाहता चेन्नईच्या संघाने 10 पैकी 8 सामने जिंकत 16 गुणांसह पहिले स्थान गाठले आहे.

    मागील सामन्यात संघासाठी दमदार कामगिरी करणाऱ्या जेसन रॉयला आज मात्र खास कामगिरी करता आली नाही. तो केवळ 2 धावा करुन बाद झाला आहे. हेजलवुडच्या चेंडूवर धोनीने त्याची कॅच घेतली आहे.

    सलामीवीर जेसन रॉय दोन धावा करुन बाद झाल्यानंतर आता हैदराबादला आणखी एक मोठा झटका बसला आहे. कर्णधार केन विल्यमसन अवघ्या 11 धावा करुन बाद झाला आहे. ब्राव्होने त्याला पायचीत केलं आहे.