FIFA विश्वचषकात आज दोन मोठे सामने; इंग्लंडचा सामना युएसए सोबत तर नेदरलँड समोर इक्वेडोरचे आव्हान

भारतातील FIFA विश्वचषक २०२२ चे प्रसारण हक्क Viacom-18 कडे आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio Cinema वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

  फिफा विश्वचषक स्पर्धेत आज चार सामने खेळवले जाणार असून त्यातील दोन सामने हे अत्यंत चुरशीचे होणार आहेत. यात वेल्स विरुद्ध इराण, कतार विरुद्ध सेनेगल, नेदरलँड विरुद्ध इक्वेडोर आणि इंग्लंड विरुद्ध युएसए या सामन्यांचा समावेश असून राऊंड ऑफ १६ गाठण्यासाठी आजचे सर्व सामने महत्वाचे आहेत.

  विश्वचषकात वरचढ समजल्याजाणाऱ्या इंग्लंड आणि नेदरलँडच्या संघांनी आपापले सामने जिंकल्यास ते पुढील फेरीतील त्यांचे तिकीट निश्चित करतील.

  १. वेल्स विरुद्ध इराण : वेल्सचा शेवटचा सामना यूएसए विरुद्ध अनिर्णित राहिला, तर इराणचा इंग्लंडकडून पराभव झाला आहे. अशा परिस्थितीत आजचा हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. जर इराण हरला तर त्यांच्यासाठी पुढे जाण्याचा मार्ग बंद होईल, तर वेल्स संघाला पराभवाला सामोरे जावे लागले तर त्यांच्यासाठी राऊंड ऑफ १६ चा मार्ग आणखी कठीण होईल. दोन्ही संघ आज दुपारी ३:३० वाजता होईल.

  २.कतार विरुद्ध सेनेगल: यजमान कतार आणि सेनेगल यांच्यातील सामना संध्याकाळी ६:३० वाजता सुरू होईल. दोन्ही संघांनी पहिला सामना गमावला आहे. अशा परिस्थितीत राऊंड ऑफ १६ मध्ये एन्ट्रीसाठी त्यांना कोणत्याही किंमतीवर आज विजय आवश्यक असेल. पराभूत संघाचं आव्हान संपुष्टात येऊ शकतं.

  ३. नेदरलँड विरुद्ध इक्वेडोर: हा सामना रात्री ९:३० वाजता होणार आहे. शेवटच्या सामन्यात नेदरलँडने सेनेगलचा तर इक्वेडोरने कतारचा पराभव केला होता. आजच्या सामन्यातील विजयी संघ पुढील फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित करेल.

  ४.इंग्लंड विरुद्ध युएसए: आज रात्री उशिरा इंग्लंड आणि युएसए अर्थात अमेरिका यांच्यात सामना होणार आहे. सामना १२:३० वाजता सुरू होईल. जर इंग्लंडने हा सामना जिंकला तर पुढील फेरीत ते आपलं स्थान जवळपास पक्क करतील इंग्लंडने गेल्या सामन्यात इराणचा ६-२ ने एकतर्फी पराभव केला होता. त्याचवेळी अमेरिकेचा सामना वेल्सविरुद्ध अनिर्णित राहिला.

  भारतातील FIFA विश्वचषक २०२२ चे प्रसारण हक्क Viacom-18 कडे आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio Cinema वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.