
आज आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये दोन सामना पार पडणार आहेत. पहिला सामना सकाळी १०.३० वाजता बांग्लादेश आणि अफगाणिस्तान (Bangladesh and Afghanistan) यांच्यात पार पडणार आहे. हा सामना धरमशाळा येथे खेळविण्यात येणार आहे.
धरमशाळा – आयसीसी वनडे वर्ल्डकपला (2023) तसेच क्रिकेटच्या महासंग्रामाला पाच तारखेला सुरुवात झाली आहे. (Icc Cricket World Cup 2023) यात दोन दिवसांत अनेक महत्त्वाच्या संघाचे सामने पार पडले आहेत. उद्या बहुप्रतिक्षित व बहुचर्चित भारताचा सलामीचा सामना कांगारुसोबत होणार आहे. तर आज विकइंन्ड असल्यामुळं क्रिकेटप्रेमीसाठी मेजवानी आहे. कारण आज आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये दोन सामना पार पडणार आहेत. पहिला सामना सकाळी १०.३० वाजता बांग्लादेश आणि अफगाणिस्तान (Bangladesh and Afghanistan) यांच्यात पार पडणार आहे. हा सामना धरमशाळा येथे खेळविण्यात येणार आहे. त्यामुळं दोन्ही संघाचा हा पहिलाच सामना असल्यामुळं यात बाजी कोण मारणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
This blockbuster Saturday brings you the first double-header of #CWC23 👊#BANvAFG | #SAvSL pic.twitter.com/2Rgwn2luOP
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 7, 2023
श्रीलंका-दक्षिण आफ्रिका भिडणार
तर दुसरीकडे सामना आज श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका (Sri Lanka-South Africa) ऐकमेकांशी भिडणार आहेत. यांच्यात दुसरा सामना दिल्ली येथे पार पडणार आहे. हा सामन्याला दुपारी दोन वाजता सुरुवात होणार आहे. आज पहिल्या सामना जिंकण्याकडे दोन्ही संघाचा कल असेल. उद्या भारताची गाठ कांगारुसोबत पडणार आहे. याआधी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लडचा पराभव केला आहे. काल झालेल्या सामन्यात पाकिस्ताने नवख्या नेदरलड्चा पराभव केला.
विकइंन्डला क्रिकेटप्रेमीना मेजवानी
आज विकइंन्ड असल्यामुळं क्रिकेटप्रेमीसाठी मेजवानी आहे. कारण आज आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये दोन सामना पार पडणार आहेत. एक सामना धरमशाळा येथे होणार आहे. तर दुसरा सामना राजधानी दिल्लीत येथे होणार आहे. त्यामुळं विकइंन्डला क्रीडाप्रेमीना आज दोन्ही क्रिकेट सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. उद्या रविवार व सुट्टीचा दिवस असल्यानं भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सामन्याची मजा घेता येणार आहे.