टीम इंडियाला मोठा धक्का, आणखी एक खेळाडू टेस्ट सीरिजमधून बाहेर ; कोणाला मिळणार संधी?

उमेश यादव (Umesh Yadav) बुधवारी रात्रीच भारतात (Back to India) रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे. कसोटीच्या (Test Match) तिसऱ्या दिवशी उमेशला दुखापत (Injured) झाली होती. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागलं होतं. परंतु आता उमेशला कसोटी सामन्यातून बाहेर जावे लागणार आहे.

मेलबर्न : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये (IND vs AUS ) तिसऱ्या कसोटी सामन्याला आता सुरूवात होणार आहे. परंतु तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) पुढचे दोन सामने मुकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमेश यादव बुधवारी रात्रीच भारतात (Back to India) रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी उमेशला दुखापत (Injured) झाली होती. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागलं होतं. परंतु आता उमेशला कसोटी सामन्यातून बाहेर जावे लागणार आहे.

टी नटराजनला संधी?

दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये उमेश यादव लयीमध्ये होता. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने जो बर्न्सला माघारी धाडलं, या इनिंगमध्ये त्याला फक्त ३.३ ओव्हरच करता आल्या. आता तिसऱ्या टेस्टमध्ये उमेश यादवच्याऐवजी टी नटराजन (T.Natrajan) या खेळाडूला संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या मर्यादित ओव्हरच्या सीरिजमध्ये नटराजनने दिमाखदार कामगिरी केली होती.