उर्वशी रौतेलाने केली भविष्यवाणी, अहमदाबादला पोहचली सामना पाहण्यासाठी

आता हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील अहमदाबादला पोहचली आहे. सध्या सोशल मिडियावर उर्वशीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

    उर्वशी रौतेला : वर्ल्ड कप २०२३ चा सामना सुरु होण्यासाठी काही मिनिटे शिल्लक राहिले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ज्या क्षणाची सर्व भारतीयांना प्रतिक्षा लागली होती तो क्षण आता आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील आयसीसी विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना आज रंगणार आहे. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. आता सामना सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. आज भारताच्या संघाकडे २००३ वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव पत्करावा लागलेला संघाकडून बदल घेण्याची संधी आहे. अशा परिस्थितीत या महामुकाबल्याचा आनंद घेण्यासाठी क्रिकेटर आणि बॉलिवूड सेलिब्रिटीही अहमदाबादला पोहोचत आहेत. अभिनेता विवेक ओबेरॉय त्याचा मुलगा विवानसोबत अहमदाबादला पोहोचला होता. तर सारा देखील अहमदाबादला पोहचली आहे.

    आता हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील अहमदाबादला पोहचली आहे. सध्या सोशल मिडियावर उर्वशीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ती टीम इंडिया आणि तिच्या आवडत्या क्रिकेटरबद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री विमानतळावर दिसत आहे यावेळी मीडियाने तिला पाहिले आणि वर्ल्ड कप फायनलबाबत प्रश्न विचारले. यावेळी उर्वशी म्हणाली, ‘मी खूप उत्साहित आहे. भारतच विश्वचषक ट्रॉफी जिंकेल असा मला विश्वास आहे.’ यासोबतच तिने विश्वचषक ट्रॉफी हातात घेऊन त्याला किस केलं असल्याचा अनुभव देखील शेअर केला.

    तिला कोणता क्रिकेटर खुप आवडतो याबद्दल बोलाताना तिने सांगितले की संपूर्ण टीम तिची फेव्हरेट आहे. आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या सामना पाहण्यासाठी रजनीकांत, शाहरुख, सलमान खान, दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग, रणबीर कपुर असे अनेक लोकप्रिय कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.