US बास्केटबॉलपटूला रशियात ९ वर्षांची कैद, ठोठावला १३ लाख रुपयांचा दंड

अमेरिकेने ग्रिनरच्या सुटकेसाठी रशियापुढे प्रिझनर स्वॅपिंग अर्थात कैद्यांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव ठेवला आहे. अमेरिकेने ब्रिटनीच्या सुटकेच्या मोबदल्यात धोकादायक रशियन आर्म्स डीलर व्हिक्टर बाउट याच्या सुटकेची ऑफर ठेवली आहे.

    नवी दिल्ली – रशियाच्या एका न्यायालयाने अमेरिकन बास्केटबॉलपटू ब्रिटनी ग्रिनर हिला ९ वर्षांचा तुरुंगवास व जवळपास १३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ब्रिटनीला मादक पदार्थांच्या तस्करीचा ठपका ठेवण्यात आला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कोर्टाच्या या निर्णायाला कडाडून विरोध दर्शवत रशियाकडे ‘प्रिझनर स्वॅप’ करार मान्य करण्याचे आवाहन केले आहे.

    अमेरिकेने ग्रिनरच्या सुटकेसाठी रशियापुढे प्रिझनर स्वॅपिंग अर्थात कैद्यांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव ठेवला आहे. अमेरिकेने ब्रिटनीच्या सुटकेच्या मोबदल्यात धोकादायक रशियन आर्म्स डीलर व्हिक्टर बाउट याच्या सुटकेची ऑफर ठेवली आहे.

    व्हाइट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ते जॉन किर्बी याविषयी म्हणाले -आम्ही रशियापुढे एक गंभीर प्रस्ताव ठेवला आहे. रशियाने तो मान्य केला पाहिजे. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रशियाने या प्रिझनर सौद्यांतर्गत वादिम कसीसिकोव्ह याच्या सुटकेची मागणी केली आहे. वादिम हत्येच्या आरोपाप्रकरणी जर्मनीच्या तुरुंगात बंदिस्त आहे. पण किर्बी यांनी अमेरिकेने या मुद्यावर अद्याप विचार केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. वादिमच्या सुटकेचा विषय चर्चेचा नसल्याचे अमेरिकेने या प्रकरणी म्हटले आहे.