तामिळनाडूनच्या वैशाली रमेशबाबूने रचला इतिहास, भारताची तिसरी महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर म्हणून मिळवला मान!

कोनेरू हंपी आणि हरिका द्रोणवल्ली यांच्याशिवाय ग्रँडमास्टर विजेतेपद मिळवणारी ती तिसरी महिला खेळाडू आहे.

    ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदचं नाव तर प्रसिद्ध आहेच. तामिळनाडूनच्या चेन्नईमधील प्रज्ञानानंदने2018 मध्ये प्रतिष्ठित ग्रँडमास्टर विजेतेपद मिळवलं. हा पराक्रम गाजवणारा तो हा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे. आता त्याची बहीण वैशाली रमेशबाबूने सुद्धा एक नवा इतिहास रचला आहे. स्पेनमधील लॉब्रेगॅट ओपनमध्ये 2500 रेटिंग पार करून वैशाली भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर ठरली आहे. या यशासह, वैशाली आणि प्रज्ञानानंद ही जगातील पहिली ग्रँडमास्टर भाऊ-बहीण जोडी बनली आहे.

    यापूर्वी भारताच्या कोनेरू हंपी आणि हरिका द्रोणावली या महिला ग्रँडमास्टर होत्या. आता वैशाली रमेशबाबू ग्रँडमास्टर झाली आहे. ग्रँडमास्टर झाल्यानंतर वैशाली म्हणते की, मला जेतेपद मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. जेव्हा मी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली तेव्हापासून ग्रँडमास्टर होण्याचे स्वप्न होते. असही ती म्हणाली.

    कोनेरू हंपी आणि हरिका द्रोणवल्ली यांच्याशिवाय ग्रँडमास्टर विजेतेपद मिळवणारी ती तिसरी महिला खेळाडू आहे. ती आता विश्वनाथन आनंद, हम्पी, द्रोणवल्ली, दिव्येंदू बरुआ, रमेशबाबू प्रज्ञानंध इत्यादी महान खेळाडूंसह 80 हून अधिक भारतीय बुद्धिबळपटूंच्या कंपनीत सामील झाली आहे ज्यांना ही पदवी देण्यात आली आहे.

    तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या दोघांचेही या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.