विराटच्या शतकासाठी अंपायरचे मोलाचे सहकार्य, त्या अंपायरला भारतरत्न दिलेच पाहिजे, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

    पुणे : भारतीय क्रिकेट प्रेक्षकांच्या मनात अंपायर रिचर्ड केटलब्रॉ यांचे स्थान अढळ झाले आहे. त्याला कारणही तसेच आहे. काल भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात झालेल्या सामन्याच्या दरम्यान जे घडलं त्याची साऱ्या क्रिकेटविश्वात चर्चा सुरु झाली आहे. नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत.

    विराटला शतकालासाठी दोनच धावांची गरज

    भारताला जिंकण्यास दोन धावा हव्या होत्या. आणि विराटला शतकालाही दोनच धावांची गरज होती. बांग्लादेशच्या गोलंदाजीनं वाईड चेंडू टाकला मात्र तो अंपायर रिचर्डनं तो वाईड चेंडू दिलाच नाही. आणि विराटला पुन्हा एकदा संधी मिळाली आणि त्यानं सिक्सर मारुन आपलं शतक पूर्ण केलं. अंपायरनं तो चेंडू वाईड का दिला नाही याविषयीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

    सोशल मीडियावर मोठ्या चर्चेला उधाण

    दुसरीकडे सोशल मीडियावर मोठ्या चर्चेला उधाण आले आहे. अनेकांचे म्हणणे असे की, ज्यांनी त्या अंपायरच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहिले असतील त्यांना कळून जाईल की, त्यांनी वाईड चेंडू का दिला नाही, या गोष्टीचा नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरुन चांगलाच समाचार घेतला आहे. काहींनी त्यावर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात कित्येकांनी फायनलला देखील हाच अंपायर हवा, असे त्यांनी म्हटले आहे.

    नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना

    काही मीम्समध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष जयेश शहा आणि अमित शहा यांच्यावरुन देखील वेगवेगळ्या मीम्सला उधाण आले आहे. बेटा जय आपल्याला फायनललादेखील हाच अंपायर हवा. अशा आशयाचे मीम्स नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यावरून अनेकांनी दिलेल्या प्रतिक्रियादेखील भन्नाट आहेत.

    वर्ल्डकपमध्ये अंपायर रिचर्ड अनेकांच्या गंमतीचा विषय

    सध्याच्या वर्ल्डकपमध्ये अंपायर रिचर्ड अनेकांच्या गंमतीचा आणि चर्चेचा विषय झाले आहेत. काहींनी बॉलीवूडमधील वेगवेगळ्या चित्रपटातील इमेजचा वापर करुन मीम्स शेयर केले आहेत. त्याचीही चर्चा होत आहे. त्यामुळे येत्या सामन्यांमधून अंपायर रिचर्ड यांच्या कामगिरीकडे लक्ष राहणार आहे. काहींनी सोशल मीडियावर जे मीम्स शेयर केले आहे त्यातून रिचर्ड यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. भारताच्या पुढील सामन्यांमध्ये देखील रिचर्ड यांनीच अंपायर म्हणून काम करावे अशी गंमतीशीर मागणीही करण्यात आली आहे.