वसई-विरार १०वी मॅरेथॉन स्पर्धा ११ डिसेंबरला, कॉमनवेल्थ रौप्य पदक विजेता अविनाश साबळे स्पर्धेचा अँम्बेसेडर

जी देशातील शर्यतींमध्ये सर्वाधिक बक्षीस रकमेपैकी एक आहे. आणि केवळ भारतीय खेळाडूंसाठी याशिवाय वसई-विरार पट्ट्यातील हौशी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र बक्षीस निधीमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी मंगळवारी वसई येथे पत्रकार परिषदेत इतर मान्यवर आणि मॅरेथॉनचे आयोजक व संस्थेशी निगडित व्यक्तींसोबत ही घोषणा केली. 

    वसई – कोरोनामुळं दोन वर्षांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर, राष्ट्रीय स्तरावरील वसई-विरार महानगरपालिका १०वी मॅरेथॉन (VVMCM) स्पर्धा ११ डिसेंबर २०२२ रोजी होणार असल्याचं आज पालिकेकडून जाहिर करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन वसई विरार शहर महानगरपालिका व वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यांत आले आहे. या स्पर्धेच्या अस्तित्वाची दहा वर्षे साजरी करण्यासाठी आणि भारतीय क्रीडापटू आणि हौशी धावपटूंसाठी देशातील अग्रगण्य स्पर्धांपैकी एक म्हणून वसई विरार शहर महानगरपालिकेने बक्षीस रक्कम वाढवली आहे.

    दरम्यान, बक्षिसांच्या रक्कमेत तब्बल १८ लाख रुपयांनी वाढ करुन एकूण ५४ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. जी देशातील शर्यतींमध्ये सर्वाधिक बक्षीस रकमेपैकी एक आहे. आणि केवळ भारतीय खेळाडूंसाठी याशिवाय वसई-विरार पट्ट्यातील हौशी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र बक्षीस निधीमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी मंगळवारी वसई येथे पत्रकार परिषदेत इतर मान्यवर आणि मॅरेथॉनचे आयोजक व संस्थेशी निगडित व्यक्तींसोबत ही घोषणा केली.

    हौशी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी, महानगरपालिकेने नोंदणी शुल्कात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. जे पूर्ण मॅरेथॉनसाठी तसेच हाफ मॅरेथॉन आणि ११K करिता ७५० रुपये, आणि ५K साठी ७०० रुपये आहे. (सुविधा शुल्क आणि GST वगळून ) www.vvmm.in या इव्हेंटच्या वेबसाइटवरून नोंदणी करतायेईल. प्रत्येक स्पर्धाप्रकारात मोठ्या प्रमाणात नोंदणीसाठी प्रतिसाद मिळत असून, येत्या २४ नोव्हेंबर २०२२ रोजी नोंदणी बंद केली जाणार आहे. अविनाश साबळे इव्हेंट अॅम्बेसेडर असतील, अव्वल क्रीडा धावपटूंना त्यांच्या उपस्थितीसह कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्याच्या परंपरेनुसार, १० व्या आवृत्तीत कॉमनवेल्थ गेम्स रौप्यपदक विजेता आणि ऑलिम्पिक अंतिम फेरीतील अविनाश साबळे हे इव्हेंट अॅम्बेसेडर म्हणून असतील.

    देशभरातील क्रीडापटूंना आकर्षित करण्यासाठी मोठ्या स्तरावर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केल्याचा वसई विरार शहर महानगरपालिकेला अभिमान वाटतो. प्रत्येक सहभागीसाठी संस्मरणीय धावण्याचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे माननीय आयुक्त म्हणाले.