विनेश फोगटने मारली पॅरिस ऑलम्पिक २०२४ मध्ये एन्ट्री, कझागिस्थानच्या कुस्तीपटूला केले पराभव

अंतिम फेरीमध्ये कझागिस्थानच्या कुस्तीपटूला पराभूत करून पॅरिस ऑलम्पिक कोटामध्ये जागा मिळवली आहे. भारतीय महिला कुस्तीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

    विनेश फोगट : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने (Vinesh Phogat) पॅरिस ऑलम्पिक 2024 (Paris Olympics 2024) मध्ये एंट्री केली आहे. तिने उपांत्य फेरीमध्ये कझागिस्थानच्या कुस्तीपटूला पराभूत करून पॅरिस ऑलम्पिक कोटामध्ये जागा मिळवली आहे. भारतीय महिला कुस्तीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. भारताचा संघ पहिल्यांदाच ऑलम्पिक 2024 मध्ये कुस्तीच्या दोन संघांमध्ये खेळणार आहे. फोगटने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या लॉरा गानिकिझीवर 10-0 असा मोठा विजय नोंदवून पॅरिस गेम्ससाठी कुस्तीमध्ये भारताचा दुसरा कोटा निश्चित केला.

    2024 कुस्ती ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा किर्गिझस्तानच्या बिश्केक येथे आयोजित करण्यात आली आहे, विनेश महिला फ्रीस्टाइल 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीसाठी पात्र झाली आहे. विनेशचा पहिला गेम निर्दोष होता, जिथे तिने राऊंड ऑफ 16 टायमध्ये दक्षिण कोरियाच्या चेओन मिरानचा 10-0 असा पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत, तिने कंबोडियाच्या डिट समनांगचा VFA (विक्ट्री बाय फॉल) द्वारे पराभव केला, विजय मिळवण्यासाठी एका मिनिटापेक्षा कमी वेळ घेतला.