कॅप्टन कोहलीचा ‘विराट’ कारनामा; मैदानात उतरताच विक्रम नावावर

विराट कोहलीने 61 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यापूर्वी हा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. महेंद्रसिंह धोनीने 60 टेस्टमध्ये टीम इंडियाची कॅपटन्सी केली आहे. धोनीच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात भारताने 27 कसोटी सामन्यात विजय, तर 18 सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. विराटने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना पहिल्या कसोटीनंतर माघार घेतली होती. त्यामुळे विराटला धोनीचा विक्रम मोडण्यासाठी या महामुकाबल्यापर्यंत वाट पाहावी लागली.

    साऊदम्प्टन : मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामन्याला शनिवारी सुरूवात झाली. या सामन्यात मैदानात उतरताच कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. भारतासाठी सर्वाधिक वेळा कर्णधारपद भूषविण्याचा मान त्याला मिळाला आहे.

    विराट कोहलीने 61 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यापूर्वी हा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. महेंद्रसिंह धोनीने 60 टेस्टमध्ये टीम इंडियाची कॅपटन्सी केली आहे. धोनीच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात भारताने 27 कसोटी सामन्यात विजय, तर 18 सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. विराटने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना पहिल्या कसोटीनंतर माघार घेतली होती. त्यामुळे विराटला धोनीचा विक्रम मोडण्यासाठी या महामुकाबल्यापर्यंत वाट पाहावी लागली.

    विराटची नेतृत्वातील कामगिरी

    विराटने आतापर्यंत 60 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. या 60 पैकी 36 सामन्यांमध्ये विराटने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात विजय मिळवून दिला आहे. तर केवळ 14 मॅचमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. तर विराटला 10 मॅच अनिर्णित राखण्यास यश आले आहे. विराटने आपल्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडियाला सलग 9 वेळा सीरिज जिंकवून देण्याचा पराक्रम केला आहे.

    हे सुद्धा वाचा