Virat kohli Big Announcement! मॅच सुरु होण्याआधीच विराटने दिला जबरदस्त धक्का; टी-२० वर्ल्ड कपनंतर कॅप्टनशीप सोडण्याच्या निर्णयानंतर घेतला आणखी एक मोठा निर्णय

आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडच्या पहिल्याच (IPL 2021) मॅचआधीच विराट कोहलीने (Virat Kohli) एक मोठी घोषणा केली. आयपीएलच्या या सिजननंतर बँगलोरचा (RCB) कर्णधार राहणार नाही असे विराट कोहलीने म्हंटले आहे. आपण आरसीबीचं नेतृत्व सोडलं असलं तरीदेखील आपण शेवटपर्यंत आरसीबीसाठीच खेळू असंही विराटने स्पष्ट केलं आहे. विराटने सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर करत ही घोषणा केली.

    मुंबई : विराट कोहलीने(Virat Kohli) गुरुवारी अचानक आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन (Twitter Account) एकर पत्र पोस्ट करत, टी-२०ची कॅप्टन्सी(Resigns from T-20 Captaincy) सोडण्याची घोषणा केली आहे. यावर्षी १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरच्या काळात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपनंतर विराट कर्णधारपद सोडणार असल्याचे विराटने जाहीर केले. यानंतर विराटने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

    आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडच्या पहिल्याच (IPL 2021) मॅचआधीच विराट कोहलीने (Virat Kohli) एक मोठी घोषणा केली. आयपीएलच्या या सिजननंतर बँगलोरचा (RCB) कर्णधार राहणार नाही असे विराट कोहलीने म्हंटले आहे. आपण आरसीबीचं नेतृत्व सोडलं असलं तरीदेखील आपण शेवटपर्यंत आरसीबीसाठीच खेळू असंही विराटने स्पष्ट केलं आहे. विराटने सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर करत ही घोषणा केली.

    2013 पासून विराट IPL मधील बंगलोर संघाची कप्तानी करत आहे. विराट कोहलीने यावर्षीच्या ipl मोसमानंतर बंगलोर ची कप्तानी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या स्टेटमेंटनुसार हेव्ही वर्कलोडमुळे तो बंगलोर टीमच्या कप्तानिवरून यावर्षीच्या IPL नंतर राजीनामा देत आहे.

    सर्वाचे आभार मानले

    मी स्वताला खूप भाग्यवान समजतो, की मला माझ्या कतृत्वाच्या जोरावर भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. माझ्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत, ज्यांनी ज्यांनी मला पाठिंबा दिला, त्या सर्वांचा मी आभारी आहे. टीममधील प्लेअर्स, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, कोच यांच्याशिवाय हे सर्व शक्य नव्हते. यातील प्रत्येकाने प्रत्येक मॅचमध्ये विजयासाठी प्रार्थना केली आहे. यांच्यासह ज्यांनी ज्यांनी भारताच्या विजयासाठी प्रार्थना केली, त्यांचा मी आभारी आहे.

    माझ्या मते, वर्क लोड (Work Load) ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मी गेल्या ८-९ वर्षांपासून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. ( टेस्ट, वन डे, टी २०) आणि गेल्या ५ ते ६ वर्षआंपासून कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. टेस्ट आणि वन डेत टीम इंडियाचे कर्णधारपद(Team India Captain) उत्तमरित्या सांभाळण्यासाठी, आणि त्यासाठी स्वत:ला तयार करण्यासाठी मला थोडी स्पेस हवी आहे. टी-२० च्या कर्णधारपदाच्या भूमिकेतून मी टीमला सर्व काही दिले आहे. यापुढेही एक बॅट्समन म्हणून मी टी-२०त माझे योगदान सुरुच ठेवीन.

    अशा निर्णयांवर पोहचण्यासाठी थोडा वेळ लागतो. टीमच्या नेतृत्वातील महत्त्वाचे भाग असलेल्या रवी शास्त्री, रोहित शर्मा आणि माझ्या सहकाऱ्यांशी बराच काळ केलेल्या चर्चेनंतर मी हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि सर्व निवड समितीतील सदस्यांशी याबाबत मी चर्चा केली आहे. आगामी काळातही मी भारतीय क्रिकेट टीम आणि भारतीय क्रिकेटची सेवा करीतच राहीन. असे त्याने या पत्रात लिहिले आहे.