
25 कोटींपेक्षा जास्त फॉ़ओअर्स असणारा तो एकमेव भारतीय आहेत. यासोबतच जगात इन्स्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या खेळाडूंमध्ये तो तिसऱ्या स्थानी पोहचलेला आहे. पहिल्या क्रमांकावर रोनाल्डो तर दुसऱ्या क्रमांकावर मेस्सीचा नंबर आहे.
मुंबई – टीम इंडियाचा (India) स्टार बॅट्समन अशी ओळख असलेल्या विराट कोहलीनं (Virat Kohli) एक नवा रेकॉर्ड त्याच्या नावे केला आहे. त्याला इन्साटावर (Insata) 25 कोटीहून अधिक फॉ़लोअर्स आहेत. 25 कोटींपेक्षा जास्त फॉ़ओअर्स असणारा तो एकमेव भारतीय आहेत. यासोबतच जगात इन्स्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या खेळाडूंमध्ये तो तिसऱ्या स्थानी पोहचलेला आहे. पहिल्या क्रमांकावर रोनाल्डो तर दुसऱ्या क्रमांकावर मेस्सीचा नंबर आहे.
विराटचे चाहते वाढतायेत…
आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बंगळुरुचा ओपनिंग बॅट्समन असलेल्या विराटनं यंदा चांगली कामगिरी नोंदवलीय. 14 मॅचेसमध्ये विराटनं 53.25 च्या सरासरीनं 639 रन्स जमा केल्यात. या सिझनमध्ये त्यानं दोन सेंच्युरी आणि 6 हाफ सेंच्युरी झळकावल्यात. 101 नॉट आऊट हा त्याचा सिझनमधला बेस्ट परफॉर्मन्स मानला जातोय. आत्तापर्यंतच्या लिगमध्ये सर्वाधिक रन्स करणारा विराट तिसरा बॅट्समन आहे.
भारतातील पहिल्या क्रमांकाचा क्रिकेटर
या सगळ्यात विराटची लोकप्रियताही प्रचंड़ वाढलेली दिसते आहे. इन्स्टावर फॉलो होणारा तो भारतातील पहिल्या क्रमांकाचा क्रिकेटेर ठरलाय. संपू्र्ण आशिया खंडाचा विचार केला तरी त्याचे फॉलोअर्स प्रचंड संख्येत आहेत. आयपीएलमधील आरसीबीचा प्रवास थांबला असला तरी विराट आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियलनशीपच्या तयारीला लागलाय. याची फायनल ओव्हल ग्राऊंडवर होणार आहे. 7 जूनपासून या मॅचेस सुरु होतील.