चाहत्यांनी ‘छोले-भटुरे’ म्हटल्यावर विराट कोहलीला आवरले नाही हसू, व्हिडीओ व्हायरल

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये विराट कोहलीसमोर चाहत्यांनी जोरजोरात 'छोले-भटूरे' म्हणायला सुरुवात केली.

    विराट कोहलीची फॅन फॉलोइंग जगभरात करोडोंच्या संख्येमध्ये आहे. हा भारतीय खेळाडू जगातील सर्वाधिक चाहते असलेल्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. या खेळाडूबद्दल चाहत्यांची तळमळ कोणापासून लपलेली नाही. मात्र, विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये विराट कोहलीसमोर चाहत्यांनी जोरजोरात ‘छोले-भटूरे’ म्हणायला सुरुवात केली. यानंतर या अनुभवी फलंदाजाला हसू आवरता आले नाही. यानंतर विराट कोहलीने मजेशीर प्रतिक्रिया दिली.

    विराट कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

    व्हायरल व्हिडिओमध्ये पाहिलं जातं की विराट कोहलीसमोर चाहत्यांनी जोरजोरात ‘छोले-भटूरे’ म्हणायला सुरुवात केली. तेव्हा त्याला हसू आवरता आलं नाही. यानंतर भारताच्या माजी कर्णधाराची मजेशीर प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी आपल्या आवडत्या क्रिकेटरची स्टाइल पसंत केली आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.