Virat Kohli, Grammy Smith, Ricky Ponting Everyone's record was broken; Steve Waugh is the best captain of the century

21 व्या शतकातील महान कसोटी कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉची निवड झाली आहे. या यादीमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ, ऑस्ट्रेलियाचाच माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि भारतीय कसोटी संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली यांना मागे टाकले आहे.

    दुबई : 21 व्या शतकातील महान कसोटी कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉची निवड झाली आहे. या यादीमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ, ऑस्ट्रेलियाचाच माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि भारतीय कसोटी संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली यांना मागे टाकले आहे.

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या डब्ल्यूटीसी फायनलच्या पाचव्या दिवशी लंचनंतर ही घोषणा करण्यात आली. स्टीव्ह वॉच्या नावाची घोषणा करताना भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर म्हणाले की, पॉन्टिंग, कोहली, स्मिथ आणि स्टीव्ह यांच्यापैकी स्मिथ आणि स्टीव्ह यांच्यातील लढाई शेवटपर्यंत सुरू होती.

    तथापि, स्टीव्हने शेवटी विजय मिळविला कारण त्याच्या कर्णधारपदी ऑस्ट्रेलियाचा संघ 48 आठवड्यांपैकी 46 आठवडे अव्वल स्थानी होता.