Virat Kohli had a fight with the umpire; BCCI's big decision after defeat against Kolkata; Read in detail

काल इडन गार्डनवर झालेल्या KKR vs RCB यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात आरसीबीचा निसटता पराभव झाला. परंतु, विराटची विकेट चर्चेचा विषय ठरली. कारण विराटची विकेट गेल्यानंतर विराट कोहलीचे अंपायरशी वाद झाले होते. त्यामुळे आता बीसीसीआयने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

  KKR vs RCB, IPL 2024 : IPL 2024 स्पर्धेत 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर 1 धावेने रोमांचक विजय मिळवला होता. दरम्यान, रविवारी (21 एप्रिल) ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात विराट कोहलीचे त्याची विकेट ज्या चेंडूवर गेली, त्या चेंडूवरून मैदानावरील पंचांशी वाद झाल्याचे पहायला मिळाले होते. यानंतर आता त्याच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याने बीसीसीआयने कारवाई केली आहे. त्याला बीसीसीआयने सामना शुल्काच्या (Match Fee) 50 टक्के दंड ठोठावला आहे.

  लेव्हल 1 ची चूक
  बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार त्याने आयपीएलच्या आचार संहितेतील कलम 2.8 च्या अंतर्गत लेव्हल 1 ची चूक केली आहे. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली असून त्याने ही चूक मान्य केली आणि कारवाईही मान्य केली आहे.
  काय झाले होते?
  या सामन्यात कोलकाताने दिलेल्या २२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला उतरलेल्या विराटला तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हर्षित राणाने बाद केले. त्याने टाकलेल्या फुलटॉसवर त्यानेच झेल घेतला होता.
  मात्र, विराटच्या म्हणण्यानुसार हा चेंडू त्याच्या कंबरेच्या वर होता त्यामुळे नो-बॉल होता. त्यामुळे त्याने रिव्ह्यू घेतला. यावेळी थर्ड अंपायर मायकल गॉफ यांच्या मते तो चेंडू विराटच्या कंबरेच्या खाली होता. तसेच रिव्ह्युमध्ये बॉल ट्रॅकिंगमध्येही असे दिसले की जर विराट क्रिजमध्ये उभा असता, तर तो चेंडू त्याच्या कंबरेच्या खाली असता. त्यामुळे हा चेंडू वैध ठरवण्यात आला. या घटनेनंतर विराट पॅव्हेलियनमध्ये परत जाताना चिडला होता. यावेळी त्याचे मैदानावरील पंचांबरोबरही भांडण झाले होते.
  बंगळुरूचा पराभव
  विराटने या सामन्यात 7 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांसह 18 धावा केल्या होत्या. तसेच बेंगळुरूकडून विल जॅक्स (55) आणि रजत पाटीदार (52) यांनी अर्धशतके केली होती. अखेरीच्या षटकात कर्ण शर्माने 3 षटकार मारून बेंगळुरूला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, बेंगळुरूला विजयासाठी 2 धावा, तर बरोबरीसाठी 1 धाव कमी पडली.
  कोलकाताकडून गोलंदाजीत आंद्र रसेलने सर्वाधिक 3 विकेट्स
  तत्पुर्वी, कोलकाताकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार श्रेयस अय्यरने 24 धावांची खेळी केली. तसेच फिल सॉल्टने 48 धावांची खेळी केली. तर रिंकू सिंग (24), आंद्र रसेल (27*) आणि रमनदीप सिंग (24*) यांनी छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. बंगळुरूकडून गोलंदाजीत यश दयाल आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.