कोहलीवर RCB च्या कर्णधारपदाची टांगती तलवार, संघातून नवीन चेहरे आले समोर

विराटने कर्णधारपदाचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा प्रभाव आरसीबीच्या टीमवर पडू शकतो. सोमवार (२० सप्टेंबर) खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात बंगळुरूच्या टीमला कोलकाता संघाने हरवलं होतं. बंगळुरूने फक्त ९२ धावा काढल्या होत्या. त्यामुळे कोलकाताने १० ओव्हरमध्येच बंगळुरूला गाठोड्यात बांधलं होतं.

    नवी दिल्ली: रॉयल चॅलेंजर बंगलोर (RCB) चा कर्णधार विराट कोेहलीने धक्कादायक बातमी दिली आहे. विराट कोेहलीला UAE  मध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या कर्णधार पदावरून हटवले जाऊ शकतो. कोहलीने  केलेल्या वक्तव्यानंतर, आयपीएल २०२१ (IPL 2021) च्या हंगामानंतर कोहली कर्णधार पदावरून पायउतार होणार आहे. अशा प्रकारचं धक्कादायक ट्विट त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे. त्यामुळे विराटनंतर नवखा आणि पुढील टीमची धुरा सांभाळण्यासाठी कोणता खेळाडू बेस्ट असेल. असे अनेक प्रश्न आरसीबीच्या चाहत्यांसमोर निर्माण झाले आहेत.

    विराटने कर्णधारपदाचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा प्रभाव आरसीबीच्या टीमवर पडू शकतो. सोमवार (२० सप्टेंबर) खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात बंगळुरूच्या टीमला कोलकाता संघाने हरवलं होतं. बंगळुरूने फक्त ९२ धावा काढल्या होत्या. त्यामुळे कोलकाताने १० ओव्हरमध्येच बंगळुरूला गाठोड्यात बांधलं होतं.

    संघातून नवीन चेहरे आले समोर

    विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर काही खेळाडूंची नावे समोर आली आहेत. आरसीबीमधून मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, देवदत्त पडीक्कल आणि वॉशिंग्टन सुुंदर हे भारतीय खेळाडू सध्या आघाडीवर आहेत. सिराज आणि चहल या दोघांमध्ये कुरघोडी लागल्याचे समजले जात आहे.

    कारण दोघेेही युवा आणि २७ ते ३१ वयवर्ष असलेले खेळाडू आहेत.परंतु डिव्हिलियर्स हा टीमचा उपकर्णधार आहे. तसेच त्याने ३ वर्षापू्र्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु एक जबरदस्त आणि अनुभवी खेळाडू म्हणून डिव्हिलियर्सची निवड केली जाऊ शकते.