विराट कोहलीने नवा रेकॉर्ड बनवत धोनी-रोहितला टाकलं मागे, अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू

केकेआर विरुद्धच्या २००व्या सामन्यात विराट बॅटने कमाल करु शकला नाही. तो ५ धावा करुन बाद झाला. पण त्याने हा दमदार रेकॉर्ड मात्र स्वत:च्या नावे केला. आय़पीएल सुरु झाल्यापासून म्हणजे २००८ सालापासून विराट आरसीबी संघासोबत आहे. त्याने १९२ डावांत ३७.९७ च्या सरासरीने ६ हजार ८१ धावा केल्या आहेत.

    आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने केकेआर विरूद्धच्या सामन्यात आयपीएलमधील मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. विराटने रेकॉर्ड ब्रेक करत दिग्गज कर्णधार एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांनांही मागे टाकले आहे. विराट कोहलीने आयपीएलच्या इतिहासात एकाच संघाकडून तब्बल २०० सामने खेळण्याचा रेकॉर्ड केला आहे.

    केकेआर विरुद्धच्या २००व्या सामन्यात विराट बॅटने कमाल करु शकला नाही. तो ५ धावा करुन बाद झाला. पण त्याने हा दमदार रेकॉर्ड मात्र स्वत:च्या नावे केला. आय़पीएल सुरु झाल्यापासून म्हणजे २००८ सालापासून विराट आरसीबी संघासोबत आहे. त्याने १९२ डावांत ३७.९७ च्या सरासरीने ६ हजार ८१ धावा केल्या आहेत.

    आरसीबीसाठी खेळताना विराटने पाच शतकं आणि ४० अर्धशतकं ठोकली आहेत. दरम्यान २०० सामने आरसीबीकडून खेळणारा विराट या पर्वानंतर आरसीबीचं कर्णधारपद सोडणार आहे.