विराट कोहलीला 2016 सालीच घ्यायची होती महेंद्रसिंग धोनीची जागा, तिन्ही फॉरमॅटमध्ये हवी होती कॅप्टन्सी, माजी फिल्डिंग कोच यांचा गौप्यस्फोट. रवी शास्त्रींनी..

२००७ साली कॅप्टन्सीची धुरा सांभाळल्यानंतर जानेवारी २०१७ पर्यंत सुमारे १० वर्ष धोनीनं टीम इंडियाचं एकहाती नेतृत्व केलं. धोनीनं डिसेंबंर २०१४ साली टेस्ट क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१५ पासून कोहली टेस्ट टीमचं नेतृत्व करतोय.

    नवी दिल्ली – टीम इंडियाचा (Team India) माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) हा सार्वजनिक ठिकाणी नेहमी त्याचा सिनियर महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni ) याचं कौतुक रताना दिसतो. तोच आपला कॅप्टन असल्याचंही सांगतो. पण विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यातील छुपा संघर्ष आता समोर आलाय. २०१६ साली विराट कोहलीला धोनीची जागा घ्यायची होती. असा गौप्यस्फोट माजी फिल्डिंग कोच आर श्रीधर (R. Shreedhar) यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. यावरुन माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराटला चांगले ऐकवले होते, असंही या पुस्तकात लिहिण्यात आलंय.

    नेमकं काय घडलं होतं?

    महेंद्रसिंग धोनीनं त्यावेळी टेस्टमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर विराट कोहलीला ऑस्ट्रोलिया दौऱ्यासाठी कॅप्टन्सी देण्यात आली. त्यानंतर वन डे आणि टी-20 टीमची कॅप्टन्सी धोनी कडे होती. तर विराट कोहली व्हाईस कॅप्टन होता. २००७ साली कॅप्टन्सीची धुरा सांभाळल्यानंतर जानेवारी २०१७ पर्यंत सुमारे १० वर्ष धोनीनं टीम इंडियाचं एकहाती नेतृत्व केलं. धोनीनं डिसेंबंर २०१४ साली टेस्ट क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१५ पासून कोहली टेस्ट टीमचं नेतृत्व करतोय. धोनी हा क्रिकेट इतिहासातील व्हाईट बॉलचा सर्वाधिक यशस्वी कॅप्टन आहे. त्याच्या कॅप्टन्सीत टी-२० वर्ल्ड़ कप, वर्ल्ड कप आणि टॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियानं जिंकल्यात.

    माजी भारतीय कोच आर श्रीधर यांनी सांगितलं आहे की, कोहली २०१६ साली टीमचं नेतृत्व करण्यासाठी उत्सुक होता. याबाबत रवी शास्त्री यांनी कोहलीची विशेष भेट घेतली होती, या भेटीत धोनीचा सन्मान ठेवाययला हवा, असं कोहलीला सांगण्यात आलं होतं. विराटला तुझीही वेळ येईल, त्यावेळी तुझाही सन्मान राखला जाईल, असंही सांगण्यात आलं होतं.

    रवी शास्त्रींनी काय सांगितलं विराटला ?

    त्यावेळी रवी शास्त्रींनी विराट कोहलीला फोन केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, विराट, तुला धोनीनं रेड बॉलची कॅप्टन्सी दिली होती. तुला त्याचा आदर ठेवायला हवा. धओनी तुला मर्यादित ओव्हर्सच्या क्रिकेटमध्येही संधी देईल. जर आज तु धोनीचा आदर राखला नाहीस, तर जेव्हा तू कॅप्टन होशील तेव्हा टीमचे सदस्य तुझा आदर ठेवणार नाहीत. कॅप्टन्सी तुझ्याकडे येईल, त्यासाठी तुला तिच्यामागे पळण्याची गरज नाही.

    धोनी आणि विराटमध्ये चांगलं बॉन्डिंग असल्याचं नेहमीच सांगण्यात येतं. टेस्ट मॅचची कॅप्टन्सी विराट कोहलीनं सोडल्यानंतर एकमेव धोनीच होता,ज्यानं त्यावेळी फोन करुन विराचशी चर्चा केली होती.