शर्टलेस होऊन पत्नी अनुष्कासोबत बीचवर एन्जॉय करताना दिसला विराट कोहली, 20 मिनिटांत 10 लाख लोकांनी लाइक केला फोटो!

या फोटोमध्ये विराट कोहली शर्टलेस आणि शॉर्ट्स घातला आहे, तर अनुष्का शर्माने सुंदर पांढरा ड्रेस परिधान केला आहे आणि सनग्लासेस लावला आहे.

  हिवाळा (winter) म्हण्टलं की सगळ्यांचा फिरण्याचा मूड होतो. त्या सामान्य नागरिकांपासून, ते सेलेब्रिटिही (celebrity) मागे राहत नाही. नुकताच  श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावणारा विराट कोहलीही (virat kohli)  सध्या फिरण्याच्या सध्या  मूडमध्ये असून तो पत्नी अनुष्का शर्मासोबत (anushka sharma) बीचवर एन्जॉय करताना दिसत आहे. त्याचा फोटोही त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे, जो खूप पसंत केला जात आहे. बघुयात तुम्हाला विराट कोहली आणि अनुष्काचे हे सुंदर फोटो.

  विराट दिसला शर्टलेस

  शनिवारी विराट कोहलीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आणि त्याला लाल प्रेम इमोजीसह कॅप्शन दिले. या छायाचित्रात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बीचवर नाश्त्याचा आनंद घेताना दिसत आहेत. ज्यामध्ये विराट कोहली शर्टलेस आणि शॉर्ट्स घातला आहे, तर अनुष्का शर्माने सुंदर पांढरा ड्रेस परिधान केला आहे आणि सनग्लासेस लावला आहे. विराट कोहली हातात हेल्दी ड्रिंक घेतलेला दिसत आहे. दोघांचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून 20 मिनिटांतच 10 लाखांहून अधिक लोकांनी त्यांच्या फोटोला लाईक केले आहे.

  उद्या तिसरा आणि अंतिम सामना खेळवला जाणार आहे

  भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना रविवार, १५ जानेवारी रोजी तिरुअनंतपुरममध्ये खेळवला जाईल. भारतीय संघ सध्या या मालिकेत २-० ने आघाडीवर आहे. याआधी त्याने टी-20 मालिकाही 2-1 अशी खिशात घातली होती. अशा परिस्थितीत उद्याच्या सामन्यात भारतीय संघ आपल्या बेंचवर बसलेल्या खेळाडूंना संधी देऊ शकतो. यामध्ये सूर्यकुमार यादवचा समावेश आहे, जो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, परंतु त्याला अद्याप वनडे संघात स्थान मिळालेले नाही.

  गुवाहाटीमध्ये खेळली शतकी खेळी

  श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने 123 धावांचे शतक झळकावले. त्याच्यासोबत कर्णधार रोहित शर्माने 83 आणि शुभमन गिलने 70 धावा केल्या. मात्र, दुसऱ्या वनडेत विराट कोहली 4 धावा करून बाद झाला. मात्र तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीकडून पुन्हा एकदा चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.