विराट कोहलीच्या झंझावाती खेळीने आरसीबीला प्लेऑफच्या शर्यतीत ठेवलंय टिकून

कालच्या सामन्यांमध्ये पंजाब किंग्सने सुरुवात चांगली केली नाही. त्यामुळे पंजाबचा संघ १७ षटकांत १८१ धावा करून सर्वबाद झाला.

    विराट कोहली : काल पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) यांच्यामध्ये धुव्वादार लढत पाहायला मिळाली. कालचा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो अशी स्थिती दोन्ही संघांसमोर होती. त्यामुळे दोन्ही संघांसाठी कालचा सामना महत्वाचा होता. कालच्या सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुरुवारी पंजाब किंग्जचा 60 धावांनी पराभव केला. यामुळेच या विजयासह आरसीबीने प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्याचवेळी पंजाब किंग्जच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा संपल्या आहेत.

    आता आयपीएलचे पाच विजेतेपद जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्सला बंगळुरूकडून पराभव झाल्यानंतर त्यांना सुद्धा या शर्यतीतून बाहेर करण्यात आले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या धुव्वादार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) त्यांच्या दमदार फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. कालच्या सामन्यांमध्ये विजयाचा नायक विराट कोहली ठरला, त्याने अवघ्या 47 चेंडूंत सात चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 92 धावा केल्या. कोहली आणि रजत पाटीदार (55) यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर आरसीबीने 20 षटकांत सात गडी गमावून 241 धावा केल्या.

    कालच्या सामन्यांमध्ये पंजाब किंग्सने सुरुवात चांगली केली नाही. त्यामुळे पंजाबचा संघ 17 षटकांत 181 धावा करून सर्वबाद झाला. सध्या गुणतालिकेची स्थिती पाहता बंगळुरू सहाव्या स्थानावर आहे. कालच्या विजयासह आरसीबीचे 12 सामन्यांत 10 गुण झाले आहेत. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी पंजाब किंग्जचे 12 सामन्यांत 8 गुण झाले असून आता ते पुढील दोन सामन्यांमध्ये विश्वासार्हतेसाठी मैदानात उतरतील.

    पंजाबकडे सनरायझर्स हैदराबादचा खेळ खराब करण्याची सुवर्णसंधी असेल, ज्यांच्याशी त्यांचा सामना 19 मे रोजी साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात होईल. याआधी 15 मे रोजी त्याचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.