
केएल राहुलला सामनावीराचा किताब मिळाला. मात्र चांगल्या धावा करुनही विराट नाराज झाला. त्याचा हा ड्रेसिंग रुममधील व्हीडिओ व्हायरल होत आहे. तर कालचा सामन्यात जे सचिन, कपिल देवल जमले नाही ते विराटने करुन दाखवत, नवा रेकॉर्ड केला आहे.
चेन्नई/चेपॉक स्टेडियम : काल (रविवारी) भारताने कांगारुवर मोठा विजय मिळवला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सामना झाला. भारताने 6 विकेट राखून विजयी सलामी दिली. प्रथम गोलंदाजी करताना भारताने कांगारूंना 199 धावांवरच रोखले. भारताने हे आव्हान अवघ्या 41.2 ओव्हरमध्येच पार करून दणदणीत विजय मिळवला. या विजयाचे खरे शिल्पकार विराट कोहली आणि केएल राहुलच ठरले. केएल राहुलला सामनावीराचा किताब मिळाला. मात्र चांगल्या धावा करुनही विराट नाराज झाला. त्याचा हा ड्रेसिंग रुममधील व्हीडिओ व्हायरल होत आहे. तर कालचा सामन्यात जे सचिन, कपिल देवल जमले नाही ते विराटने करुन दाखवत, नवा रेकॉर्ड केला आहे. (Virat’s new record; Sachin-Kapil’s ‘Ha’ broke the record, despite scoring good runs, Virat is upset, video viral)
विराटची खंत, व्हीडिओ व्हायरल…
दरम्यान, विराटची चेस मास्टर अशी ओळख आहे. दोन धावांवर भारताच्या तीन विकेटस होत्या. यानंतर राहुल व विराटने भक्कम भागिदारी करत भारताला विजयाच्या समीप नेले. पण हेझलवूड याने विराटला 85 धावांवर असताना मार्नल लबुशेन याच्या हाती कॅच आऊट केलं. विराटने 116 बॉलमध्ये 6 सिक्ससह 85 धावा काढल्या. तर विराटचे अवघ्या 15 धावांनी हुकलं. मैदानातून बाहेर परतणाऱ्या विराटला स्टेडियममधील उपस्थितांनी उभे राहून अभिवादन केलं. पण भारताला जिंकून न दिल्याचे खंत विराटला वाटले. विराटची चेस मास्टर अशी ओळख आहे. पण विराटने ड्रेसिंग रुममध्ये पोहचल्यानंतर आपल्या स्वत:वरची नाराजी व्यक्त केली. विराटची चिडचिड ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्याने दोन वेळा डोक्याला हात लावत स्वत:वरची नाराजी व्यक्त केली. आता विराटचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विराटचा सर्वांधिक झेल घेण्याचा विक्रम
दुसरीकडे विराट कोहली कालच्या सामन्यात एक आगळा वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विश्वचषकात सर्वांधिक झेल घेण्याचा रेकॉर्ड विराटने आपल्या नावावर केला आहे. विराट कोहलीने विश्वचषकाच्या 27 डावामध्ये 15 झेल घेतले आहेत. 2011 ते 2023 यादरम्यान विराट कोहलीचा हा चौथा विश्वचषक आहे. या विश्वचषकातील 27 सामन्यात विराट कोहलीने 15 झेल घेतले आहेत. अनिल कुंबळे याने 18 सामन्यात 14 झेल घेतले आहेत. सचिन तेंडुलकर याला 44 सामन्यात फक्त 12 झेल घेता आलेत.
विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारे फिल्डर्स
विराट कोहली 27 डावात 15 झेल
अनिल कुंबळे 18 डावात 14 झेल
कपिल देव 25 सामन्यात 12 झेल
सचिन तेंडुलकर 44 डावात 12 झेल
विरेंद्र सेहवाग 22 सामन्यात 11 झेल
अझहर 19 डावात 11 झेल
झहीर खान 23 डावात 10 झेल
सुरेश रैना 12 डावात 10 झेल
के श्रीकांत 22 डावात 9 झेल