विराट-रोहितच्या भरवश्यावर वर्ल्ड कप जिंकता येऊ शकत नाही, माजी कॅप्टन कपिल देव हे काय म्हणाले ?

टीम इंडियाला जर पुन्हा वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर टीमने कठोर परिश्रम घेण्याची गरज असल्याचं कपिल देव म्हणालेत. इतकचं नाही तर बीसीसीआयची सिलेक्शन कमिटी, टीम मॅनेजमेंट यांनीही यासाठी कठोर निर्णय घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केलीय. केवळ विराट कोहली, रोहित शर्मा अशा दोन तीन प्लेअर्सच्या भरवशावर वर्ल्ड कप मिळवता येणार नाही, त्यासाठी सगळ्या टीमवर विश्वास ठेवावा लागेल, असंही ते म्हणाले.

    मुंबई- २०२३ च्या अखेरीस डिसेंबरमध्ये भारतात आयसीसीचा वनडेचा वर्ल्ड कप होणार आहे. वर्ल्ड कप जिंकण्याचं सगळ्याचं देशांचं आणि क्रिकेटर्सचं स्वप्न असतं. मा६ २०११ सालानंतर अद्याप एकदाही टीम इंडियाला ावर्ल्ड कप मिळवता आलेला नाही. टी-२०च्या वर्ल्ड कपमध्येही टीम इंडियाची कामगिरी गेले दोन वर्ष निराशाजनकच राहिलेली आहे. अशा स्थितीत सध्याच्या बड्या क्रिकेटर्सच्या भरवशावर वर्ल्ड कप जिंकता येईल का, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. या चर्चेतच आता माजी कॅप्टन आणि १९८३ च्या वर्ल्डकपचे शिलेदार कपिल देव यांनी एक वक्तव्य करुन नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा अशा दोन तीन क्रिकेटर्सच्या भरवशावर वर्ल्ड कप जिंकता येणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय.

    नेमकं काय म्हणाले कपिल देव ?

    टीम इंडियाला जर पुन्हा वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर टीमने कठोर परिश्रम घेण्याची गरज असल्याचं कपिल देव म्हणालेत. इतकचं नाही तर बीसीसीआयची सिलेक्शन कमिटी, टीम मॅनेजमेंट यांनीही यासाठी कठोर निर्णय घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केलीय. केवळ विराट कोहली, रोहित शर्मा अशा दोन तीन प्लेअर्सच्या भरवशावर वर्ल्ड कप मिळवता येणार नाही, त्यासाठी सगळ्या टीमवर विश्वास ठेवावा लागेल, असंही ते म्हणाले. टीममध्ये असलेल्या काही क्रिकेटर्सवरच सगळ्यांचं लक्ष असतं, त्यांच्याभोवतीच टीम फिरत असते. ही पद्धत आगामी काळात बदलण्याची गरजही देव यांनी बोलून दाखवलवीये. यासाठी त्या क्षमतेचे ५ ते ६ प्लेअर्स तयार करावे लागतील, असा सल्लाही त्यांनी बीसीसीआयला दिलाय.

    टीम इंडियाला होम ग्राऊंडवर संधी
    यंदाचा वर्ल्ड कप हा भारतात होणार असल्यानं टीम इंडियाला होम ग्राऊंडवर विजय मिळवण्याची सर्वाधिक संधी असल्याचंही कपिल म्हणालेत. भारताच्या ग्राऊंड्सवरची परिस्थिती टीम इंडियापेएक्षा क्वचितच इतर देशांच्या क्रिकेटर्सना माहिती असेल. त्यामुळे आत्तापासून परीश्रम केले तर यश मिळू शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. क्रिकेटर्सनी त्यांच्या फिटनसेकडे लक्ष द्यायला हवं, असा सल्लाही त्यांनी दिलाय.