लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त विराटची अनुष्कासाठी खास पोस्ट; म्हणाला “ही पाच वर्ष….”

  मुंबई : भारताचा स्टार क्रिकेटपटू फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला आज पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. चाहते या जोडीला ‘विरानुष्का’ या नावाने संबोधत असून त्यांच्या लग्नाच्या पाचव्या वाढदिवशी चाहत्यांकडून तसेच विविध क्षेत्रातील मंडळींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. विराट – अनुष्काने 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीत येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. विराट अनुष्का यांना वामिका नावाची 2 वर्षाची मुलगी आहे.

  विराट कोहली याने लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त पत्नी अनुष्कासाठी खास पोस्ट केली आहे. त्यात त्याने दोघांचा एक रोमँटिक फोटो पोस्ट करून लिहिले, “अनंतकाळच्या प्रवासात 5 वर्षे. तुला शोधून मी किती धन्य आहे, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो”.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Virat Kohli (@virat.kohli)