सामना सुरु असताना रागाने लाल झाला विराट! बांगलादेश खेळाडूला म्हणाला “तुझ्या $#$# “

    मुंबई : भारताचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहलीच्या (Virat Kohli)  आक्रमक फलंदाजीचे फॅन जगभरात आहेत. विराटची आक्रमकता जेवढी त्याच्या खेळातून दिसते तेवढीच तो अनेकदा मैदानावर वावरताना देखील दिसते. सध्या सुरु असलेल्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात विराट ऋषभ पंतवर देखील भडकलेला पहायला मिळाला. आता त्याच सामन्यातील विराटचा एक व्हिडीओ समोर आला आहेत. यात विराट बांगलादेशचं खेळाडूवर प्रचंड रागावला होता.

    टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव 314 धावावर आटोपला होता. यानंतर बांगलादेश मैदानात बॅटींगसाठी उतरली होती. दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात बांगलादेश बॅटींग करत होती. यावेळी बांगलादेशचे सलामीचे खेळाडू वेळकाढूपणा करत होते.जेणेकरून दुसरा दिवस संपेल आणि सामना ड्रॉ च्या दिशने ढकलता येईल. विराटने (Virat Kohli) बांगलादेशची हीच चुक पकडत त्यांना मैदानात सुनावले होते.

    तिसऱ्या सत्रात बांगलादेशचा संघ बॅटींगला उतरला होता. दरम्यान, नॉन स्ट्राइकला उभा असलेला शांटो त्याच्या बुटाच्या लेस बांधत होता. यावेळी काही खेळाडू डगआऊटमधून ड्रीक्स घेऊन पोहोचले होते. यावेळी 6 ओव्हर होऊन गेली होती आणि हळूहळू अंधार पडत होता.त्यामुळे बांगलादेशचे खेळाडू वेळकाढूपणा करत होते. त्यावेळी विराटने शांटोला ‘तुझा शर्ट पण घे’ असे म्हणत त्याला टोला लगावला होता. खेळाला उशीर होऊ नये आणि लवकरात लवकर षटक पूर्ण व्हावेत, अशी कोहलीची इच्छा होती. त्यामुळे तो संतापला होता.