रबाडाच्या पॉडकास्टमध्ये विराटची एन्ट्री! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सामन्यापूर्वी बेंगळुरूचा विराट कोहली (Virat Kohli) आणि पंजाबचा कागिसो रबाडा (Kagiso Rabada) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

    रबाडा-कोहली : आज पंजाब किंग्स (Panjab Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) यांच्यामध्ये आज लढत पाहायला मिळणार आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. आजचा सामना जो संघ जिंकेल तो संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहील. ज्या संघाचा आज पराभव होईल तो संघ आज प्लेऑफमधून बाहेर होणार आहे. आजचा हा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील हा सामना 58 वा सामना आहे. याचदरम्यान या सामन्यापूर्वी बेंगळुरूचा विराट कोहली (Virat Kohli) आणि पंजाबचा कागिसो रबाडा (Kagiso Rabada) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

    व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रबाडा पॉडकास्टवर बोलत आहे, त्याच दरम्यान विराट कोहली त्याच्या खोलीत आला. कोहलीला पाहून रबाडा हसायला लागतो. मग तो पॉडकास्टमध्ये सांगतो की विराट कोहली तिथे आहे. तो नाचत आहे. तेव्हा रबाडा म्हणतो की मी पॉडकास्टवर आहे. त्यानंतर पॉडकास्टवर उपस्थित लोक रबाडाला कोहलीला येऊन नमस्कार करण्यास सांगण्यास सांगतात. मग कोहली येतो आणि पॉडकास्ट करत असलेल्या लोकांना नमस्कार करतो. त्यानंतर विराटला रबाडा कोणत्या प्रकारचा गोलंदाज आहे असा प्रश्न विचारला जातो. रबाडा स्वत: याचे उत्तर देतो आणि म्हणतो की त्याला (कोहली) वाटते की मी एक कमकुवत गोलंदाज आहे. यानंतर किंग कोहली निघून गेला.

    गुणतालिकेची स्थिती पाहता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ गुणतालिकेत अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानांवर आहे. या दोन्ही संघानी आतापर्यत 11-11 सामने खेळले आहेत. त्याचबरोबर दोन्ही संघांचे अशा परिस्थितीत आज जिंकणारा संघ प्लेऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवेल, तर पराभूत होणारा संघ बाहेर पडेल. 8-8 गुण आहेत.