भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील विजयानंतर सेहवागचं सूचक ट्विट, म्हणाला…..

भारताच्या विजयानंतर वीरेंद्र सेहवागनं (Virendra Sehwag Tweet) ‘स्कॅम 1992’ वेबसीरिजमधील अभिनेता प्रतीक गांधीचा डायलॉग शेअर केला आहे. ज्यावर “अब खेलने का नहीं *** का टाईम है.” असं लिहलं आहे.

    राजकोट :  भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सामना झाला. या चौथ्या टी-२० सामन्यामध्ये भारतानं ८२ धावांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. या सामन्यामध्ये मिळालेल्या विजयानंतर भारतानं पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. तसेच चौथ्या टी-२० सामन्यात भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) चांगली कामगिरी केली. भारताच्या सलग दुसऱ्या विजयानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं एक ट्विट केलं आहे.

    भारताच्या विजयानंतर वीरेंद्र सेहवागनं ‘स्कॅम 1992’ वेबसीरिजमधील अभिनेता प्रतीक गांधीचा डायलॉग शेअर केला आहे. ज्यावर “अब खेलने का नहीं *** का टाईम है.” असं लिहलं आहे. “आज पहिल्या हाफमध्ये डीके आणि त्यानंतर आवेश खान , ज्यांचे पहिले तीन सामन्यात विकेट न घेतल्यामुळं त्यांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात होते, भारतीय संघानं शानदार विजय मिळवला, असंही वीरेंद्र सेहवागनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. सेहवागनं केलेल्या ट्विटची खूप चर्चा सुरु आहे.