वानिंदू हसरंगा लीगमधून बाहेर, SRH ला मोठा धक्का!

वानिंदू हसरंगा मोसमाच्या मध्यात पुनरागमन करू शकेल, असे मानले जात होते, परंतु आता तो संपूर्ण हंगामाचा भाग नसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    ५ मार्च ला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये लढत झाली. यामध्ये सनरायझर्स हैदराबादने शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. परंतु आता सनरायझर्स हैदराबादसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू वानिंदू हसरंगा संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे अशी बातमी समोर आली आहे. याचदरम्यान असे सांगितले जाते की, वानिंदू हसरंगा मोसमाच्या मध्यात पुनरागमन करू शकेल, असे मानले जात होते, परंतु आता तो संपूर्ण हंगामाचा भाग नसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    आयपीएलमध्ये वानिंदू हसरंगा सनरायझर्स हैदराबादपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता. त्याच वेळी, सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2024 च्या लिलावात वानिंदू हसरंगाचा समावेश केला. आतापर्यत वानिंदू हसरंगाने आयपीएलमध्ये 26 सामने खेळले आहेत, ज्यात गोलंदाज म्हणून त्याने 8.13 च्या इकॉनॉमी आणि 21.37 च्या सरासरीने 35 विकेट्स घेतल्या आहेत. वानिंदू हसरंगाची आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 18 धावांत 5 बळी. मात्र, वानिंदू हसरंगा आयपीएलमध्ये फलंदाज म्हणून वाईटरित्या फ्लॉप झाला आहे. वानिंदू हसरंगा आयपीएल 2024 मध्ये भाग घेणार नाही. श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) ने बीसीसीआयला कळवले आहे की लेगस्पिनर दुखापतग्रस्त आहे आणि या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या लीगमध्ये भाग घेऊ शकत नाही.