दिल्ली कॅपिटल्सचा स्वस्त खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला पडला महागात, एक षटकात मारल्या 30 धावा

या डोंगराला तोंड देत डीसीचा फलंदाज जेक फ्रेझर मॅकगर्कने अविश्वसनीय फलंदाजी करून सर्वांचं चकित केले. फलंदाज जेक फ्रेझर मॅकगर्कने तिसऱ्याच षटकात एसआरएचचा गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला घाम फोडला.

    फ्रेझर मॅकगर्क : इंडियन प्रीमियर लीगचा हा सिझन दमदार वेळात सुरु आहे आणि दिवसेंदिवस या स्पर्धेची क्रेझ वाढत आहे. IPL 2024 चा 35 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. जिथे मुसळधार पाऊस पडला. हैदराबादने 20 षटकांत दिल्लीसाठी धावांचा डोंगर उभा केला होता. एसआरएचने 7 गडी गमावून 267 धावांचे लक्ष्य ठेवले. ज्याच्या प्रत्युत्तरात डीसी 200 धावाही करू शकला नाही. परंतु याचदरम्यान धावांच्या या डोंगराला तोंड देत डीसीचा फलंदाज जेक फ्रेझर मॅकगर्कने अविश्वसनीय फलंदाजी करून सर्वांचं चकित केले. फलंदाज जेक फ्रेझर मॅकगर्कने तिसऱ्याच षटकात एसआरएचचा गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला घाम फोडला.

    फ्रेझर मॅकगर्कने सुंदरला ओव्हरशॉडो केले. तोपर्यंत डीसीने दोन विकेट गमावल्या होत्या आणि वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट घेतली होती. परंतु तिसऱ्याच षटकात फ्रेझर मॅकगर्क सुंदरच्या पुढे फलंदाजी करत होता. सुंदरच्या पहिल्याच चेंडूवर फ्रेझर मॅकगर्कने चौकार ठोकला. दुसऱ्या चेंडूवरही त्याने चौकार मारला. त्यानंतर तो शांत झाला नाही त्याने तिसऱ्या चेंडूवर सुद्धा षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवरही सुंदरला चौकाराचा सामना करावा लागला. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर फ्रेझर मॅकगर्कने चेंडू हवेत फिरवत षटकार लगावला. या षटकात फ्रेझर मॅकगर्कने 30 धावा दिल्या.

    आयपीएल 2024 च्या ऑक्शनमध्ये जेक फ्रेझर मॅकगर्क हा न विकलेला खेळाडू होता. फ्रेझर मॅकगर्कला त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत फक्त तीन सामने खेळता आले आहेत. या तीन सामन्यांमध्ये त्याने 222.22 च्या स्ट्राईक रेटने 140 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 65 आहे. ज्यामध्ये 9 चौकार आणि 14 षटकारांचा समावेश आहे. पण IPL 2024 च्या लिलावात Jake Fraser McGurk हा न विकला गेला. दिल्ली कॅपिटल्सने लुंगी एनगीडीच्या बदल्यात त्याच्या मूळ किमतीत 50 लाख रुपयांवर स्वाक्षरी केली. फ्रेझर-मॅकगुर्क बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडूनही खेळतो.