राजस्थान रॉयल्सचा चेन्नई सुपर किंग्सवर 32 धावांनी विजय

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्था रॉयल यांच्यातील सामन्यात राजस्थान रॉयलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानची सुरुवात उत्तम झाली. धोनीने सुरुवातील फास्टर बॉलर आकाश सिंहला काढले. परंतु, यशस्वी जयस्वालने वेगवान गोलंदाजांना चांगलेच पाणी पाजले. पहिल्या पॉवर प्लेमध्ये राजस्थानने संघाच्या धावसंख्या 60 पर्यंत नेली होती. जोस बटलर एक उत्तुंग फटका मारताना रवींद्र जडेजाच्या चेंडूवर झेलबाद झाला. यशस्वी जयस्वालने शानदार 50 हाफसेन्चुरी मारली. तुषार देशपांडेच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारताना यशस्वी 77 धावांवार आऊट झाला. त्याच्याअगोदर कर्णधार संजु सॅमसन तुषारच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारताना ऋतुराजद्वारे झेलबाद झाला. राजस्थानला त्यांच्या होमग्राऊंडचा फायदा होणार का, पाहुया आज आयपीएल हंगामातील 37 व्या सामन्याचे लाईव्ह अपडेट तुमच्यासाठी...

    जयपूर : तिक्ष्णाने हेटमायरचा क्लिन बोल्ड घेत पॅव्हेलिनमध्ये पाठवले. त्यानंतर आलेला ध्रुव जुरैलने चमकमदार टोलेबाजी करीत मथिशा पथिरंगाला मैदानाच्या चौफेर फटके मारले. देवदत्त पडिकल आणि ध्रुव जुरैल यांनी चांगली भागीदारी करीत राजस्थानला एक चांगला स्कोर दिला. ध्रुव जुरैल 15 चेंडूत 34 धावा करून रनआऊट झाला. राजस्थानने शेवटच्या ओव्हरमध्ये शानदार फटकेबाजी करीत धावसंख्या 202 वर नेऊन ठेवली. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 202 धावा केल्या.

    राजस्था रॉयलची कामगिरी

    आज आयपीएलमध्ये चेन्नई विरुद्ध राजस्थान लढत चालू आहे. राजस्थान रॉयलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आता राजस्थानची सलामी जोडी मैदानात उतरली आहे. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर डावाची सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलरने शानदार फटकेबाजी करीत राजस्थानला 10 षटकांत 100 धावांवर नेले. जोस बटलर आज लवकरच जडेजाच्या चेंडूवर झेलबाद झाला.

    राजस्थान रॉयलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, संजू सॅमसनने ठरवले की, आपण प्रथण बॅटींग करून मोठी धावसंख्या उभारून चेन्नईला तगडे आव्हाने देऊ शकतो. चेन्नई सुपर किंग्ज त्यांच्या चांगल्या फॉर्मने आयपीएल गुणतालिकेत सर्वात वरच्या स्थानावर पोहचले आहे, तर दुसरीकडे राजस्थान रॉयल त्यांची पराभवाची हॅट्ट्रीक टाळण्याचा प्रयत्न करणार आहे.

    दोन्ही संघ या हंगामातील तगडे संघ म्हणून प्रस्थापित झाले आहेत. राजस्थानने मागील सामन्यात चेन्नईला हरवले होते, आता या पराभवाचा चेन्नई वचपा काढणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

    राजस्थान रॉयलने सुरुवातीच्या पाच सामन्यांपैकी चार जिंकले आहेत. परंतु, शेवटच्या दोन सामन्यांमध्ये ते थोडे अडखळले आहेत. आता आयपीेएल हंगामातील तिसरा पराभव त्यांना थोडा दडपणाखाली आणेल. दुसरीकडे सीएसकेने रॉयल्सला त्यांच्याच होमग्राऊंडवर हरवल्यानंतर त्यांचे नशीब वळले आहे. दुखापतींमुळे त्यांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे पण तरीही ते सामने जिंकत आहेत. अजिंक्य रहाणेच्या फॉर्मने त्यांना त्या टॉप ऑर्डरमध्ये अतिरिक्त स्पार्क प्रदान केला आहे आणि त्यांना तुषार देशपांडे आणि आकाश सिंगच्या रूपात चेंडूसह नवीन गोलंदाज सापडले आहेत.

     

    चेन्नई सुपर किंग्जचा संघ : रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (सेनापती), तुषार देशपांडे, महेश थेक्षाना, मथीशा पाथीराना, आकाश सिंग

    राजस्थान रॉयलचा संघ : जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (c/wk), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, आर अश्विन, संदीप शर्मा अॅडम झाम्पा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल