Watch IPL 2024 Rajasthan Royal vs Gujarat Titans match live updates at Mansingh Stadium, Jaipur

    Rajasthan Royal vs Gujarat Titans Live : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू असलेल्या राजस्थान रॉयल विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानची सुरुवात डळमळीत झाली कारण त्यांची सलामी जोडी लवकरच बाद झाली. परंतु त्यानंतर कर्णधार संजू सॅंमसन आणि रियान पराग यांनी चांगली भागीदारी केली. दोघांनी मिळून संघाच्या धावसंख्येला चांगला आकार देत राजस्थानला 150 पार नेले. रियान परागला चांगली लय सापडल्याने त्याने 44 चेंडूत 68 धावा ठोकल्या. त्यानंतर संजू सॅमसनने 33 चेंडूत 57 धावा चोपल्या आहेत. राजस्थान 18 ओव्हरमध्ये 162 धावांपर्यंत पोहचले आहे.

    मोहित शर्माकडून रियान परागला जीवदान

    रियान परागला ६५ धावांवर जीवदान मिळाले. पॉईंट क्षेत्ररक्षक या झेलला न्याय देऊ शकला नाही आणि त्याने एक सोपा झेल सोडला. यावेळी तो ऑफ स्टंप लाईनच्या बाहेर टाकलेल्या पूर्ण चेंडूवर मोठा शॉट खेळायला गेला. चेंडूचा वेग कमी करा. चेंडू बाहेरच्या काठाने हवेत उंच उडला, जो क्षेत्ररक्षक योग्यरित्या खाली येऊ शकला नाही आणि झेल घेण्याची संधी गमावली.

    इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या 24 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध नाणेफेक गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्स प्रथम फलंदाजी करत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. पावसामुळे हा सामना 10 मिनिटे उशिरा म्हणजे 7.40 वाजता सुरू झाला.