विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये इंग्लंड संघाने घातला धुमाकूळ; ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल

  ऑस्ट्रेलिया येथे पारपडलेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने पाकिस्तान संघाचा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावले. इंग्लंडला दुसऱ्यांदा टी २० विश्वचषकावर नाव कोरण्यात यश आले असून या विजयानंतर इंग्लंड संघाने ड्रेसिंगमध्ये जाऊन धम्माल सेलिब्रेशन केले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंग्लंडने फायनल जिंकल्या नंतर ड्रेसिंग रूम मध्ये खेळाडूंनी शॅम्पेन उडवून आनंद साजरा केला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ICC (@icc)

  शॅम्पेन उडवून सेलिब्रेशन करताना काय घडले?


  कर्णधार जोस बटलर आणि इतर खेळाडूंनी विजयानंतर ट्रॉफीसोबत फोटो काढली. यादरम्यान स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अली आणि आदिल रशीदही इंग्लंड संघासोबत व्यासपीठावर सहभागी होते. पण फोटो काढल्यानंतर शॅम्पेन उडवून सेलिब्रेशनची वेळ येताच इंग्लंडचा संघ काही वेळ थांबला. मोईन अली आणि आदिल रशीदने स्टेजवरून उतरल्यानंतर इंग्लंडच्या संघाने जोरदार शॅम्पेन उडवून विजय साजरा केला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ ही व्हायरल होत आहे. यावर मुस्लिम बांधव सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करीत असून इंग्लंड संघाने धार्मिक विविधतेचा आदर केल्याचे म्हंटले जात आहे.