…याला म्हणतात HOW IS THE JOSH : IND Vs PAK सामना पाहण्यासाठी आज लग्नाची सराई आणि बँडबाजा रद्द, तरूणाईमध्ये क्रेझ कायम

लाहोरमध्ये हलक्या सरींचा पाऊस (Raining in Lahor) पडत असल्यामुळे मोकळ्या मैदानात मोठ-मोठे स्क्रीन (Big Screen ) लावलेले नाहीयेत. अशातच लग्नाच्या हॉलमधील तारखा आणि बुकींग पुढे (Marriage dates postpone) ढकलण्यात आल्या आहेत. तिथे स्क्रीन लावण्यात येत आहे. अनेक प्रकारचे मीम्स सोशल (Memes on social media) मीडियावर व्हायरल होत आहेत.

  भारत आणि पाकिस्तान (IND Vs PAK) या दोन संघामध्ये आज दोन वर्षानंतर क्रिकेटचा सामना रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या (Babar Azam) शहरात लाहोरमध्ये या सामन्याला घेऊन जबरदस्त क्रेझ (Craze) पाहायला मिळत आहे. लाहोर आज होणारे लग्न सराई (Marriage Cancel) सुद्धा रद्द करण्यात आले आहेत. लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच येथील तरूणाईमध्ये उत्साहाचं (People are very excited) वातावरण आहे.

  लाहोरमध्ये हलक्या सरींचा पाऊस (Raining in Lahor) पडत असल्यामुळे मोकळ्या मैदानात मोठ-मोठे स्क्रीन (Big Screen ) लावलेले नाहीयेत. अशातच लग्नाच्या हॉलमधील तारखा आणि बुकींग पुढे (Marriage dates postpone) ढकलण्यात आल्या आहेत. तिथे स्क्रीन लावण्यात येत आहे. अनेक प्रकारचे मीम्स सोशल (Memes on social media) मीडियावर व्हायरल होत आहेत.

  बाबर आझमची फॅमेली दुबईमध्ये, शेजाऱ्यांमध्ये हाऊ इज द जोश…

  मागील अहवाल पाहिला असता, पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये (Pakistan Team) भारताच्या विरूद्ध एकही सामना जिंकलेला नाहीये. परंतु यंदाच्या सामन्यात लोकांचं लक्ष सामना जिंकण्यावर आणि पाकचा कर्णधार बाबर आझमवर आहे. बाबरची संपूर्ण फॅमेली (All family Came in dubai) त्यांना पाठींबा देण्यासाठी दुबईमध्ये (Dubai) पोहोचली आहे.

  लाहोरमधील डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटी विभागात जिथे बाबरचं घर आहे, तेथील लोकांमध्ये आणि शेजाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. शेजाऱ्यांचं म्हणणं आहे की, बाबर आझमचा शांत स्वभाव आणि एकाग्रता पाकिस्तानी संघासाठी एका चांगला बदल घडवून आणू शकतो.

  लाहोरमध्ये प्रत्येक रस्त्यावर दिसतोय जोश

  लाहोरमध्ये क्रिकेट प्रेमी खूप उत्सुक आहेत. काही लोकांनी आपल्या नातेवाईकांना सामना बघण्यासाठी घरी येण्याचं आमंत्रण दिलं आहे. सामना पाहताना खाण्याची आणि जेवणाची सोय सुद्धा करून ठेवली आहे. जरी लाहोरमध्ये पाऊस पडत असला, तरी लोकांमध्ये प्रचंड क्रेझ दिसत आहे.