शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा टीम इंडियावर दणदणीत विजय; 6 वर्षानंतर 3-2 नं टी-20 मालिका जिंकली

सूर्याने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. तर तिलकने 27 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत अल्झारी जोसेफच्या एका षटकात 19 धावा केल्या. भारताने 9 विकेट्स गमावत 165 धावसंख्या उभारला. पण विडिंजच्या आक्रमकतेपुढे भारतीय गोलंदाजी फिकी पडली.

    फ्लोरिडा : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India, Vs west Indies) यांच्यातील पाच टी-20 मालिकेतील (T20 Series) काल पाचवा व मालिकेतील शेवटचा सामना पार पडला. हा सामना वेस्ट इंडिजनं जिंकत मालिका 3-2 नं खिशात घातली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने विजयासाठी विंडिजसमोर 166 धावांचे आव्हान ठेवले होते. (WI vs IND 1st T20) पण विडिंजनं दोन गडयांच्या मोबदल्यात हे आव्हान पार करत मालिकेवर आपले नाव कोरले. विंडीज संघाकडून ब्रॅंडन किंगने मोठी खेळी साकारली तर पूरणने त्याला 47 धावांची चांगली साथ दिली. भारताकडून सूर्याकुमारने दमदार अर्धशतकी खेळी साकारली. (West Indies resounding victory over Team India in the last match; Won the T20 series by 3-0)

    भारताची खराब सुरुवात…

    दरम्यान, नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची सुरुवात खूपच खराब झाली. सलामी जोडी गिल व यशस्वी जयस्वाल झटपट बाद झाले.  त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी भारतीय संघाचा डाव सावरला. सूर्याने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. तर तिलकने 27 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत अल्झारी जोसेफच्या एका षटकात 19 धावा केल्या. भारताने 9 विकेट्स गमावत 165 धावसंख्या उभारला. पण विडिंजच्या आक्रमकतेपुढे भारतीय गोलंदाजी फिकी पडली. फक्त दोन विकेट भारतीय गोलंदाजांना घेता आले. ब्रॅंडन किंगने सर्वाधिक 85 धावांची खेळी साकारली. तर निकोलस पूरणने 47 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयाचा पाया रचला. तर शे होपने 22 धावांची खेळी साकारत किंगला साथ दिली आणि संघाला 8 विकेट्सने मोठा विजय मिळवून दिला.

    6 वर्षानंतर विडिंजचा मालिका विजय

    यापूर्वी २०१७ मध्ये वेस्ट इंडिजने टी-२० मालिकेत (१ सामन्याची मालिका) भारताचा पराभव केला होता. त्याचवेळी, वेस्ट इंडिजने भारताचा १ पेक्षा जास्त सामन्यांच्या टी-२० मालिकेत दुसऱ्यांदा पराभव केला आहे. रोव्हमन पॉवेलच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने ६ वर्षांनंतर टी-२० मालिकेत भारताचा पराभव केला आहे. या मालिकेत वेस्ट इंडिजने भारताचा ३-२ असा पराभव केला.