वेस्ट इंडिजची गाडी घसरली; 114 धावांवर सर्व संघ आटोपला, टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीपुढे पूर्ण संघ 23 ओव्हरमध्येच पॅव्हेलिनमध्ये

    किंग्सस्टन ओव्हल : भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवातच निराशाजनक झाली. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर केल मेअर्स अवघ्या 2 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर ब्रॅण्डन किंग लगोलग 17 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर अलिक अथेन्झने 22 धावा करून रवींद्र जडेजाच्या हाती झेल देऊन तंबू गाठला.

    वेस्ट इंडिजची फलंदाजी घसरली

    आज वेस्ट इंडिजचा कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. शाई होप अजून बॅटींग करीत आहे. वेस्ट इंडिजचा तडाखेबंद फलंदाज शिमरोन हेटमायरचा रवींद्र जडेजाने त्रिफळा उडवून तंबूत पाठवले. रोवमन पोवेललासुद्धा रवींद्र जडेजाने शुभमन गिलद्वारे झेलबाद केले. रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. जडेजाने रॅमिरो शेपर्डलासुद्धा बाद केले.

    कुलदीप यादवची भेदक गोलंदाजी

    कुलदीप यादवने त्याच्या गोलंदाजीची चुणूक दाखवत डोमिनिक ड्रेक्स आमि यानिक कॅरीह यांना एकामागोमाग पायचित करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर वेस्ट इंडिजचा आजच्या सामन्याचा एकमेव आशेचा किरण असलेला शाय होपलासुद्धा कुलदीप यादवने पायचित करीत तंबूचा रस्ता दाखवला. आता वेस्ट इंडिजची शेवटची गाऊडेश मोती आणि जायडेन सिल्स बॅटींग करीत आहेत. जायडेन सिल्ससुद्धा कुलदीपच्या चेंडूवर बाद होऊन पॅव्हेलिनमध्ये परतला. वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 114 धावांवर आटोपला