MS Dhoni नंतर CSKचं कर्णधारपदं कोणत्या खेळाडूकडे?, ‘या’ चार खेळाडूंची नावं आली समोर

धोनीने (MS Dhoni) आपल्या संघाला (Chennai Super Kings) तीन वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. परंतु धोेनीच्या वयोेमानानुसार आता तो निवृत्त होणार आहे. तसेच चेन्नईची पुढील जम्मेदीर कोणता खेळाडू स्वीकारणार, हे महत्त्वाचं ठरणार आहे.

    नवी दिल्ली: कॅप्टनकूल महेंद्र सिंग (MS Dhoni) धोनी आता ४० वर्षाचा झाला आहे. त्यामुळे आयपीएल (IPL) सामन्यांनंतर तो पुढच्या आयपीएलमध्ये निवृत्त होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यलो आर्मीच्या (Yellow Army) चाहत्यांमध्ये मोठा प्रश्न हाच आहे की, चेन्नई सुपर किंग्सच्या(Chennai Super Kings) कर्णधारपदानंतर माहीची जागी नक्की कोणता खेळाडू घेणार?

    धोनीने (MS Dhoni) आपल्या संघाला (Chennai Super Kings) तीन वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. परंतु धोेनीच्या वयोेमानानुसार आता तो निवृत्त होणार आहे. तसेच चेन्नईची पुढील जम्मेदीर कोणता खेळाडू स्वीकारणार, हे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण माहीनंतर चार खेळाडूंची नावे समोर आली आहेत. सलामीवीर क्रिकेटर Suresh Raina, Ruturaj Gaikwad, Ravindra Jadeja आणि Shardul Thankur या चार खेळाडूंची नावे समोर आली आहेत.

    धोनीनंतर या संघात पहिलं नाव रैनाचं

    मिस्टर आयपीएल (Mr. IPL) सुरेश रैना Suresh Rainaआता ३४ वर्षांचा आहे. त्यामुळे तो चेन्नईची धुरा पुढील ३ वर्षांसाठी तरी सांभाळू शकतो. कारण धोनीनंतर या संघात पहिलं नाव रैनाचं घेतलं जात. त्यानंतर दुसरं नाव ऋतुराज गायकवाडचं Ruturaj Gaikwadअसून २०२० मध्ये चेन्नई सुपरकिंग्स चांगलं प्रदर्शन केलं होतं. तसेच तो टीमचा विश्वासू खेळाडू समजला जातो. तिसरं नाव फिरकीपटू रविंद्र जाडेजा Ravindra Jadeja याचं आहे.

    धोेनीच्या निवृत्तीनंतर चेन्नईची धुरा सांभाळण्यासाठी जाडेजा नाव घेतलं जात आहे. कारण धोनीला त्याच्या फिटनेस आणि जबरदस्त परफॉर्मन्सवर विश्वास आहे. तसेच चौथा खेळाडू म्हणजे शार्दुल ठाकूर आहे. शार्दुलचं Shardul Thankur २०२० मध्ये सीएसकेच्या संघात समावेश करण्यात आलं. त्याच्या आंतरराष्ट्रीय अनुभव आणि आत्मविश्वावानंतर यलो आर्मीचा कप्तान बणण्यासाठी तो फीट असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या वरील चार खेळाडूंमध्ये कोणता खेळाडू वेलप्लेड आहे. हे पाहणं क्रिकेट प्रेमी आणि चाहत्यांसाठी महत्त्वाचं असणार आहे.