टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणत्या खेळाडूला मिळणार संधी?; इशान किंवा गील नाही तर ‘हा’ खेळाडू करणार रोहितसोबत ऑपनिंग

टी-20 चा संघ येत्या मे महिन्यामध्ये जाहीर होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयमध्ये बैठका सुरू झाल्या आहेत. यामध्ये काही आश्चर्यकारक निर्णय समोर येणार आहे.

    मुंबई – सध्या देशभरामध्ये आयपीएलचा रणसंग्राम रंगला आहे. आयपीएलमध्ये अनेक भारतीय खेळाडू आपली चमक दाखवत आहेत. आयपीएलनंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. आयपीएलमध्ये चमकणाऱ्या कोणत्या खेळाडूंना वर्ल्ड कपसाठी भारतीय संघामध्ये संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टी-20 चा संघ येत्या मे महिन्यामध्ये जाहीर होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयमध्ये बैठका सुरू झाल्या आहेत. यामध्ये काही आश्चर्यकारक निर्णय समोर येणार आहे.

    यंदा अनेक खेळाडू चांगली खेळी खेळत असल्यामुळे कोणला टी 20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळणार हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये ऑपनिंग करणाऱ्या शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या दौघांपैकी एकाला वगळले जाण्याची शक्यता आहे. कॅप्टन रोहित शर्मा ऑपिंग करणार असून त्याच्यासोबत कोण ऑपनिंग करणार याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज इशान किशन किंवा गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.  पण आता जे नाव समोर आले आहे ते आश्चर्यचकित करणारे असणार आहे.

    हिंदी दैनिकाने वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, येत्या 1 जूनपासून आयसीसी टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. टीम सिलेक्टरच्या झालेल्या बैठकीमध्ये कॅप्टन रोहित शर्मा ऑपनिंग करणार असल्याचा निर्णय जवळ जवळ पक्का झाला आहे. त्याचसोबत रोहित सोबत भारताचा स्टार फलंदाज ऑपनिंग करताना दिसणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सलामी करणारा विराट कोहली रोहितसोबत ओपनिंग करताना दिसू शकतो, असा दावा केला जात आहे. काही महिन्याआधी विराट कोहली संघात असणार का नाही यावरही प्रश्नचिन्ह होते. आता मात्र तो ऑपनिंग करताना दिसणार आहे. अहवालात असा दावा केला जात होता की, भारतीय संघ निवडकर्ता विराट कोहलीला सलामीवीर म्हणून खेळवण्याचाही विचार करत आहे. यामुळे ईशान किशन, शुभमन गिल आणि इतर अनेक खेळाडूंना मोठा झटका बसला आहे.