T20 विश्वचषकाचा दावेदार कोण? हरभजन सिंहची भविष्यवाणी

भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग असा विश्वास करतो की रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनीच्या 2007 च्या यशाची पुनरावृत्ती करू शकतो.

    हरभजन सिंह : काही दिवसातच T-20 विश्वचषक 2024 (T-20 World Cup 2024) सुरु होणार आहे. त्यामुळे T20 विश्वचषक 2024 चा खिताब कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताच्या संघाने १७ वर्षांपूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली एकमेव टी-20 विश्वचषक जिंकला होता. T20 विश्वचषक 2007 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 धावांनी पराभव करून ट्रॉफीवर कब्जा केला.याचसंदर्भात भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) असा विश्वास करतो की रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनीच्या 2007 च्या यशाची पुनरावृत्ती करू शकतो, जर संघाने एकत्रितपणे चांगली कामगिरी केली.

    हरभजन सिंहची भविष्यवाणी

    भारताचा माजी फिरकीपटू हरभजनने एक भविष्यवाणी केली आहे. यावेळी तो म्हणाला की, रोहित शर्मा एकटा चषक जिंकू शकत नाही. तो आपल्या सर्वांचा आहे त्याच्या एकट्यासाठी नाही. त्यामुळे आपण जितके जास्त आम्ही आम्ही सारखे खेळू तितके तुम्ही काहीही साध्य करू शकता. हरभजनने यावेळी असेही सांगितले की, दीर्घ आणि कठीण आयपीएलचा भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर निश्चितपणे परिणाम होईल आणि रोहित आणि कंपनीला या किफायतशीर लीगचा विस्तारित भाग म्हणून विश्वचषकाचा विचार करण्याचा सल्ला दिला.

    भारताचा संघ T20 विश्वचषक 2024 साठी खिताब जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. काही दिवसांपूर्वीच भारताच्या संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताचा संघ T20 विश्वचषक 2024 खेळणार आहे. भारताचा उपकर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) असणार आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, रिषभ पंत, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज हे खेळाडू T20 विश्वचषक 2024 मध्ये खेळणार आहेत.

    त्याचबरोबर राखीव खेळाडूंमध्ये शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद आणि आवेश खान या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.