क्रिकेटमधील सर्वात महागडा प्रशिक्षक कोण? तुम्ही सुद्धा पगार ऐकून व्हाल थक्क!

भारतीय संघाचा प्रशिक्षक बनू इच्छिणाऱ्याला बोर्डाने दिलेल्या मुदतीनुसार अर्ज करावा लागेल.

    बीसीसीआय : बीसीसीआय (BCCI) भारताच्या संघासाठी नवा प्रशिक्षक शोधत आहेत. त्यामुळे पुढील नवा प्रशिक्षक कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे यामध्ये त्यांनी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे. यामध्ये अनेक भारतीय खेळाडूंची त्याचबरोबर विदेशी खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक बनू इच्छिणाऱ्याला बोर्डाने दिलेल्या मुदतीनुसार अर्ज करावा लागेल. राहुल द्रविडला भविष्यात टीम इंडियासोबत प्रशिक्षक म्हणून काम करायचे असेल, तर त्यालाही त्यासाठी पुन्हा अर्ज करावा लागेल असे याआधी जय शहा यांनी सुद्धा सांगितले होते.

    हा प्रशिक्षक सर्वात महागडा

    सध्या बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डांपैकी एक आहे. बीसीसीआय आपल्या प्रशिक्षकांना सर्वाधिक पगार देते. बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाला किती पगार देणार हे उघड केलेले नाही. भारतीय मंडळाचे म्हणणे आहे की ते याबाबत अर्जदाराशी बोलणी करतील आणि केवळ अनुभवाच्या आधारे वेतन ठरवले जाईल. सध्या टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे जगातील सर्वात महागडे क्रिकेट प्रशिक्षक आहेत.

    भारताचा हेड कोच राहुल द्रविडचा पगार किती?

    मागील 2 वर्षांपासून भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. बीसीसीआय 51 वर्षीय राहुल द्रविडला प्रशिक्षक म्हणून वार्षिक 10 कोटी रुपये मानधन देते. जगातील कोणत्याही क्रिकेट प्रशिक्षकाकडून हे सर्वाधिक आहे. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. मॅकडोनाल्डला क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून (सीए) वर्षाला साडेसहा कोटींहून अधिक रुपये दिले जातात. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेटने 2022 मध्ये मॅक्क्युलमची कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. ECB ने मॅक्क्युलमला 4 वर्षांसाठी अंदाजे 16.08 कोटी रुपये दिले. हे वार्षिक 4 कोटींहून अधिक आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांना 2018 मध्ये क्रिकेट न्यूझीलंडने संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. गॅरी स्टेडला क्रिकेट न्यूझीलंडकडून दरवर्षी 1.74 कोटी रुपये दिले जातात. त्यांचा कार्यकाळ 2025 पर्यंत वाढवण्यात आला आहे. इंग्लंडचे प्रसिद्ध प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड श्रीलंका क्रिकेट संघाला आपली सेवा देतात. या बदल्यात, श्रीलंका क्रिकेट बोर्ड सिल्व्हरवुडला वार्षिक 50 लाख रुपयांपेक्षा जास्त पगार देते.