T20 विश्वचषक 2024 नंतर मुख्य प्रशिक्षक कोण? जय शाहने दिले चोख उत्तर

बीसीसीआय (BCCI) कार्यालयात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना शाह म्हणाले, येत्या काही दिवसांत आम्ही भेटीगाठी घेऊ. राहुल द्रविडचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे.

    2 जून पासून T20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) सुरु होणार आहे. T20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Head coach Rahul Dravid) असणार आहेत. द्रविडचा मूळ करार दोन वर्षांसाठी होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या 50 षटकांच्या विश्वचषकानंतर द्रविड आणि सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ एका वर्षासाठी वाढवण्यात आला होता. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. जय शहा (Jay Shah) यांनी स्पष्ट केले की नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी असेल.

    बीसीसीआय (BCCI) कार्यालयात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना शाह म्हणाले, येत्या काही दिवसांत आम्ही भेटीगाठी घेऊ. राहुल द्रविडचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षकपदावर राहायचे असेल तर त्यांना पुन्हा अर्ज करावा लागेल. राहुल द्रविडचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. आम्ही सुमारे तीन वर्षांच्या दीर्घ कार्यकाळासाठी प्रशिक्षक शोधत आहोत.” बीसीसीआय सचिव म्हणाले की, वेगवेगळ्या फॉर्मेटसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षकांच्या नियुक्तीची कोणतीही उदाहरणे नाहीत, परंतु क्रिकेट सल्लागार समितीचा निर्णय अंतिम असेल. जतीन परांजपे, अशोक मल्होत्रा ​​आणि सुलक्षणा नाईक सीएसीमध्ये आहेत.

    पुढे जय शाह म्हणाले, वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे प्रशिक्षक नेमण्याची भारतीय क्रिकेटमध्ये कोणतीही उदाहरणे नाहीत. आमच्याकडे असे अनेक खेळाडू आहेत जे सर्व फॉरमॅट खेळतात. असे अनेक खेळाडू आहेत – ऋषभ पंत, विराट कोहली आणि रोहित शर्मा, जे सर्व फॉरमॅटमध्ये सहभागी होतात. शेवटी हा CAC चा निर्णय आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल, तो मी अमलात आणेन. जर सीएसी परदेशी प्रशिक्षक निवडत असेल तर मी हस्तक्षेप करणार नाही.” बीसीसीआय सचिवांनी सांगितले की राष्ट्रीय निवडकर्ता पद लवकरच भरले जाईल.