बाजी कोण मारणार? भारत-कांगारुमध्ये आजपासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपला सुरुवात, कोणाचे पारडे जड, वाचा…

काही महिन्यापूर्वी बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारताने कांगारुना धूळ चारत मालिका जिंकली होती. दरम्यान, या मालिकेत अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्यामुळं या कसोटीत या दोघांवर विशेष लक्ष असेल. त्यामुळं जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवर नाव कोण कोरणार, याकडे सर्व क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे.

    इंग्लड – नुकतीच आयपीएलची (IPL) सांगता झाली आहे. या दोन महिन्याच्या या रणसंग्रामानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया (Inida vs Australia) यांच्यात आजपासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपला (Wrold test championship) सुरुवात होत आहे, बुधवारपासून इंग्लडमधील ओव्हल येथे पहिल्यांदाच जून महिन्यात कसोटी खेळविली जाणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचं बोललं जातंय. काही महिन्यापूर्वी बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारताने कांगारुना धूळ चारत मालिका जिंकली होती. दरम्यान, या मालिकेत अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्यामुळं या कसोटीत या दोघांवर विशेष लक्ष असेल. त्यामुळं जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवर नाव कोण कोरणार, याकडे सर्व क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे.

    मागच्यावेळी न्यूझीलंडकडून भारताचा पराभव

    दरम्यान, मागील वर्षी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी सामना झाला होता. या सामन्यात किवी संघाने भारतावर मात केली होती. त्यामुळं भारताला अद्याप जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवर एकदाही नाव कोरता आलेले नाही.

    अजिंक्य रहाणेला संधी मिळणार?

    दुसरीकडे आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळं भारताचा कसोटीपटू अजिंक्य रहाणेला अंतिम अकरा खेळाडूमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. कारण मागील काही दिवसांपासून रहाणेला खराब फॉर्ममुळं संघाबाहेर ठेवले होते. मात्र त्याला यावेळी संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.

    दोन्ही संघाना जिंकण्याची संधी…

    या कसोटीत दोन्ही संघाचा विचार केल्यास भारताची फलंदाजी भक्कम आहे, तर कांगारुंची गोलंदाजी मजबूत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शुभमन गिलआदी खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. तर कांगारंचा कर्णधार पीट कमिन्स, वॉर्नर आदी खेळाडू देखील चांगली कामगिरी करत आहेत.

    कसे आहे ओव्हलचे मैदान?

    हा सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होणार आहे. ओव्हलचे मैदान फिरकीपटूंना मदत करते, पण कसोटी सामन्याच्या असामान्य वेळेमुळे थोडी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे खेळपट्टी कशी ठरेल हे सांगणे कठीण आहे. मैदानाच्या चारही सेंटर विकेट हिरव्या आहेत, ज्यामुळे सामन्यात वेगवान गोलंदाजांना मदत होते. २७ हजार ५०० चाहच्यांच्या साक्षीने ओव्हलवर हा बहुमान मिळवण्याची दाेन्ही संघांना माेठी संधी आहे.

    …तर दोन्ही संघ संयुक्त विजेते

    या सामन्यात मानसिक पाठबळ ठरते माेलाचे ठरेल, तसेच फलंदाजीवर लक्ष केंद्रित केल्यास ओव्हलवर धावांचा पाऊस पडले. असं भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला आहे, तर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सचा असा विश्वास आहे की थोड्या कमी सरावाने येण्यापासून सुटका नाही. सामना अनिर्णीत किंवा बरोबरीत संपल्यास, दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. अंतिम सामन्यासाठी एक दिवस राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे, पण खराब हवामानामुळे खेळावर परिणाम झाला असेल आणि पाच दिवस त्याची भरपाई करता येत नसेल तरच त्याचा वापर केला जाईल.

    सामना कधी व कुठे?

    • तारीख : 7 ते 11 जून, 2023
    • ठिकाण : द ओवल मैदान, लंडन
    • संघ : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया
    • रिझर्व डे : 12 जून