मालिका कोण जिंकणार? भारत-वेस्ट इंडिज यांच्यात आज निर्णायक तिसरा सामना, ‘या’ खेळाडूच्या बदली कोहली खेळणार, सामना कुठे दिसणार?

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात खेळवण्यात येत असलेली 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका ही निर्णायक वळणावर आहे. वेस्ट इंडिजने दुसरा सामना जिंकून 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. अंतिम आणि निर्णायक सामन्यात कोण बाजी मारणार याकडे क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे.

  त्रिनिदाद : भारताने वेस्ट वेस्ट इंडिज दौऱ्यात (India Vs West Indies) कसोटी (Test) मालिका जिंकल्यानतर आता एकदिवसीय मालिकेतील आज शेवटचा व निर्णायक तिसरा सामना होणार आहे.  टीम इंडियाने वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धची 2 सामन्यांची  कसोटी मालिका 1-0 ने जिंकली. त्यानंतर आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे सामना (India Vs West Indies) भारताने विजयी सलामी दिली. दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने जिंकला त्यामुळं मालिका कोण जिंकणार याकडे क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे. अतिशय महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा सामना असल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं टीममध्ये कमबॅक होण्याची शक्यता आहे. आज जो सामना जिंकेल तो मालिका जिंकणार आहे. (who will win the series decisive third match between india and west indies today kohli will play in place of this player where will the match be seen)

  रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे कमबॅक?

  भारताकडून रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर शाई होप याच्या कॅप्टन्सीत वेस्ट इंडिज टीम मैदानात उतरेल. वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात खेळवण्यात येत असलेली 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका ही निर्णायक वळणावर आहे. वेस्ट इंडिजने दुसरा सामना जिंकून 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. अंतिम आणि निर्णायक सामन्यात कोण बाजी मारणार याकडे क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे. महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा सामना असल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं टीममध्ये कमबॅक होण्याची शक्यता आहे.

  सामन्यावर पावसाचे सावट…

  दरम्यान, एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामना त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियममध्ये खेळविण्यात येणार आहे. हवामानानुसार 1 ऑगस्टला पावसामुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. सामन्यादरम्यान पाऊस होण्याची 41 टक्के शक्यता आहे. इतकंच नाही, तर दुपारी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही 25 टक्के इतकी आहे.

  इतिहास काय सांगतो?

  इतिहास पाहता, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत एकूण 141 सामने झालेत. यामध्ये आकडेवारीच्या दृष्टीने टीम इंडियाची बाजू मजबूत आहे. टीम इंडियाने 141 पैकी 71 सामन्यात विंडिजवर विजय मिळवला आहे. तर वेस्ट इंडिजने 64 वेळा टीम इंडियावर विजय मिळवला आहे. 2 सामने हे टाय झाले आहेत. तर 4 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. त्यामुळं आज टिम इंडियाचे या सामन्यात पारडे जड असल्याचं बोललं जातंय. मालिकेतील शेवटचा सामना असल्यानं हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने टिम इंडिया मैदानात उतरेल.

  सामना कुठे पाहता येणार?

  दरम्यान, सामना मोबाईलवर फॅन कोड आणि जिओ सिनेमा या एपवरही मॅच लाईव्ह पाहता येईल. तसेच विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील वनडे सीरिजमधील सर्व सामने हे टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह पाहता येतील.

  संभाव्य भारतीय संघ

  रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, उमरान मलिक आणि मुकेश कुमार

  संभाव्य वेस्ट इंडिज संघ

  शाई होप (कॅप्टन), एलिक एथनेज, यानिक कॅरिया, कीसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्जारी जोसफ, ब्रँडन किंग, रोवमन पॉवेल (उपकर्णधार), काइल मेयर्स, गुडकेश मोती, जेडन सील्स, रोमारियो शेफर्ड, केविन सिंक्लेयर आणि ओशेन थॉमस.