रोहित शर्मा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून का खेळला? पियुष चावलाने केला खुलासा

नाणेफेकीच्या वेळी मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) रोहितबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही

    काल कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यामध्ये सामना पाहायला मिळाला. कालच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा मुंबईमध्ये कोलकाता नाईट राइडर्सने 24 धावांनी पराभव केले. कालच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडिअन्सच्या संघांत अनेक बदल पाहायला मिळाले. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) प्रभावशाली खेळाडू म्हणून मैदानात आला. या सामन्यात तो 11 धावा करून बाद झाला. नाणेफेकीच्या वेळी मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) रोहितबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही.

    काय म्हणाला पियुष चावला?
    रोहित शर्मा कालच्या सामन्यांमध्ये इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानामध्ये का उताराला असा प्रश्न काल क्रिकेट चाहत्यांना होता. या प्रश्नांचे उत्तर पियुष चावलाने स्पष्ट शब्दात दिले आहे. रोहित प्रभावशाली खेळाडू म्हणून का खेळला हे त्याने सामन्यानंतर सांगितले. केकेआरविरुद्ध रोहित प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. तो प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळला. इंडिया टुडेमधील एका बातमीनुसार, पियुष चावलाने सांगितले की, “त्याच्या पाठीत समस्या होती.” या कारणास्तव, रोहितला थोडा विश्रांती घेता यावी म्हणून त्याला क्षेत्ररक्षणासाठी न पाठवण्याचा खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. मुंबई इंडियन्सच्या वैद्यकीय पथकाला याबाबत कोणताही धोका पत्करायचा नव्हता.

    आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी खराब झाली आहे. रोहितबद्दल बोलायचे झाले तर त्याने काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मात्र आता त्याच्या पाठीच्या समस्येमुळे संघाचा ताण वाढू शकतो. सध्या रोहितच्या फिटनेसबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना सनरायझर्स हैदराबादशी आहे. हा सामना ६ मे रोजी होणार आहे.